राज्याच्या शिक्षण संचालकांच्या मुलाचे अकस्मात निधन, लग्नानंतर विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 13:59 IST2019-05-15T13:58:42+5:302019-05-15T13:59:51+5:30
श्रीशैलच्या लग्नानंतर अवघ्या विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

राज्याच्या शिक्षण संचालकांच्या मुलाचे अकस्मात निधन, लग्नानंतर विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा
पुणे : राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांचा मुलगा श्रीशैल गंगाधर म्हमाणे याचे बुधवारी अकस्मात निधन झाले. श्रीशैलच्या लग्नानंतर अवघ्या विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.सोलापूर जिल्हयातील कोरवली या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निधनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही.निधनाचे वृत्त समजताच शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी कोरवली गावाकडे धाव घेतली आहे .
(सविस्तर माहिती लवकरच...)