शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात विद्यार्थिनींना शौचालय ‘स्वातंत्र्य’!

By admin | Updated: August 18, 2014 04:12 IST

सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी वेगळी शौचालये बांधण्यात महाराष्ट्राने बरीच प्रगती केली असल्याचे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या ताज्या अहवालात स्पष्ट झाले आहे

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीसरकारी शाळांमध्ये मुलींसाठी वेगळी शौचालये बांधण्यात महाराष्ट्राने बरीच प्रगती केली असल्याचे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या ताज्या अहवालात स्पष्ट झाले आहे. सर्वांत चांगला अहवाल दिल्ली, चंदीगड, दमन दीव, लक्षद्वीप व पुडुचेरीसारख्या केंद्रशासित प्रदेशांचा आहे. त्या ठिकाणी मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाचे काम शंभर टक्के झाले असून, सर्व शौचालयांची देखभाल व्यवस्थितरीत्या केली जात आहे.महाराष्ट्रात एकूण ६७,३०३ सरकारी शाळांपैकी केवळ १,२२६ शाळांमध्ये मुलींसाठी वेगळ्या शौचालयांची व्यवस्था नाही. अन्य १२२१ शाळांमध्ये मुलांसाठी शौचालये नाहीत. २१९० सरकारी शाळांमधील मुलांसाठी आणि १०८८ शाळांमध्ये मुलींसाठी बनविण्यात आलेली शौचालये वापरात नसल्याचे आढळून आले. पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ग्रामीण भागातील शौचालयांची उणीव कमी करण्यावर भर दिला. एक वर्षात सर्व सरकारी शाळांत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था केली जावी. मुलींंना शाळेतून घरी जाण्याची वेळ येऊ नये, असे ते म्हणाले होते. त्यांच्या आवाहनानंतर दोनच दिवसांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाने देशभरातील सरकारी शाळांमधील शौचालयांच्या स्थितीबाबत अहवाल सादर केला आहे. गुजरातची स्थितीही चांगली असून, या राज्यातील एकूण ३३,७१३ पैकी केवळ ८७ सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी वेगळी शौचालये नाहीत. गोव्यात ९६१ पैकी १६३ शाळांत मुलींसाठी शौचालये नाहीत.