शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बोर अभयारण्यात विद्यार्थ्यांची पायी भ्रमंती!

By admin | Updated: August 3, 2014 00:54 IST

केंद्र शासनाने बोर अभयारण्याला नुकताच राज्यातील सहाव्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. यामुळे आपोआपच प्रकल्पाचे सर्व नियम, कायदे येथे लागू पडतात; पण बोरच्या अधिकाऱ्यांनी हेच कायदे पायदळी

गंभीर प्रकार : व्याघ्रदिनी अधिकाऱ्यांनीच नियम पायदळी तुडविलेप्रफूल्ल लुंगे - सेलू(जि.वर्धा)केंद्र शासनाने बोर अभयारण्याला नुकताच राज्यातील सहाव्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. यामुळे आपोआपच प्रकल्पाचे सर्व नियम, कायदे येथे लागू पडतात; पण बोरच्या अधिकाऱ्यांनी हेच कायदे पायदळी तुडविले़ व्याघ्र दिनी या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांसह अधिकाऱ्यांनी चक्क पायी भ्रमंती केल्याचा धक्कादायक प्रकार उघड होताच सर्वत्र खळबळ उडाली आहे़गेल्या मंगळवारी प्रकल्पाच्या सभागृहात चवथ्या जागतिक व्याघ्र दिनाचा विशेष कार्यक्रम पार पडला़ या कार्यक्रमात शासकीय अधिकारी सहभागी झाले होते. ‘वाघ वाचवा’ विषयावर निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळविल्याने शाळेतील विद्यार्थीही कार्यक्रमाला हजर होते़ काही संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर ही मंडळी व्याघ्र प्रकल्पात भ्रमंतीवर निघाली. वाहनाऐवजी जंगलाच्या आत दोन किमीपेक्षा अधिक अंतर सर्वजण पायी फिरुन आले. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. वाघ वा हिंस्त्र प्राणी कधीही हल्ला करू शकतात. आपल्यासोबत विद्यार्थी आहेत याचेही भानही कुणाला राहिले नाही. विशेष म्हणजे १ आॅक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी जंगल सफारी बंद असते. जेव्हा सफारी सुरू असते, तेव्हाही सुरक्षित वाहनातून ती करावी लागते असे व्याघ्र प्रकल्पाचे नियम सांगतात.पायी भ्रमंतीमध्ये बोरचे सहायक वनसंरक्षक उत्तम सावंत, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, माहिती अधिकारी अनिल गडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनर, न्यू बोरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी रूपाली भिंगारे सावंत, वर्धा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचा समावेश होता.