शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

३0 महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची पसंती

By admin | Updated: July 31, 2014 04:39 IST

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी नुकतीच आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी नुकतीच आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांतील ३0 नामवंत महाविद्यालयांना सर्वाधिक विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे. वाणिज्य शाखेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी सोमय्या महाविद्यालयाला पसंती दिली आहे.विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी आाणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे नोंदणी केली होती. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सुमारे साडे सातशे महाविद्यालयांपैकी मुंबईतील ३0 महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चढाओढ लागली होती. विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व नोंदणी केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.वाणिज्य शाखेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी विद्याविहार येथील एस. के. सोमय्या आणि के. जे. सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयाला पसंती दिली आहे. एस. के. सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ६ हजार ९५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तर के. जे. सोमय्या महाविद्यालयात ५ हजार १९३ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयाला सर्वाधिक पसंती मिळाली. ५ हजार २२ विद्यार्थ्यांनी रुईया महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केला. तर कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात ३ हजार ४३0 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. (प्रतिनिधी)