शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

थकीत शुल्कावर विद्यार्थ्यांना दिलासा नाही; शाळा कारवाई करू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 07:10 IST

उच्च न्यायालयाचा निर्णय. जर काही शाळा नियमबाह्य शुल्क आकारत असेल तर राज्य सरकार स्वतःहून त्याची दखल घेऊन कारवाई करू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील वाढीव शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्यातील शाळांना दिला आहे. मात्र, त्याआधीच्या शैक्षणिक वर्षाचे किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे शुल्क न भरल्यास शाळा कायदेशीर कारवाई करू शकते, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच जर काही शाळा नियमबाह्य शुल्क आकारत असेल तर राज्य सरकार स्वतःहून त्याची दखल घेऊन कारवाई करू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

कोरोनाचे संकट लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२१साठी कोणतीही शुल्कवाढ न करण्याचा आदेश राज्य सरकारने ८ मे २०२० च्या शासन निर्णयाद्वारे पारित केला. या शासन निर्णयाच्या वैधतेला अनेक खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.सोमवारच्या सुनावणीत न्यायालयाने हा शासन निर्णय वैध किंवा अवैध न ठरविता सर्व कायदेशीर मुद्दे खुले ठेवले. मात्र, विद्यार्थ्यांचे हित व सरकारची भूमिका लक्षात घेत न्यायालयाने या याचिकांवर आदेश काढला.

थकीत शुल्कासंदर्भात विद्यार्थी व पालकांना कोणतेही संरक्षण मिळणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले; परंतु त्याच वेळी (पान ५ वर)नियमबाह्य पद्धतीने शुल्क घेतल्यास शाळांवर कारवाईशाळा नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारत असेल तर पालक त्यासंबंधी सरकारकडे तक्रार करू शकतात किंवा राज्य सरकार स्वतःहून त्याची दखल घेऊन शाळांवर कायदेशीर कारवाई करू शकते. तसेच या तक्रारीचा निपटारा करेपर्यंत शाळा विद्यार्थ्यांवर कारवाई करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.    

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय