शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ जिल्हा बँका करणार शेजारच्या जिल्ह्यात कर्जवाटप

By admin | Updated: September 8, 2015 01:30 IST

राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तोळामासा झाल्याने त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातील जिल्हा

मुंबई : राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तोळामासा झाल्याने त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांना अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरिता परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सहकार विभागाने रिझर्व्ह बँकेकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य होईपर्यंत अशा जिल्ह्यांत व्यावसायिक बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावे याकरिता प्रयत्न करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी बँकांनी खरीप हंगामाचे कर्ज शेतकऱ्यांना दिलेले नाही. उस्मानाबाद बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या जेमतेम २५ टक्के तर यवतमाळ बँकेने ५० टक्के कर्ज दिले आहे. याखेरीज अन्य काही बँकांनी कर्जपुरवठ्याचे निकष पूर्ण केले असले तरी सततच्या दुष्काळामुळे कर्ज वसुलीअभावी त्यांचीही आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. या समस्येतून मार्ग काढण्याकरिता रिझर्व्ह बँकेला विनंती केली आहे, असे सहकार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.खरिपाच्या हंगामात ३२ हजार २४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यापैकी २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप १५ आॅगस्ट २०१५पर्यंत झाले होते. जिल्हा बँकांनी ११ हजार ६०८ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करावे असे लक्ष्य निश्चित केले होते. त्यापैकी ११ हजार ३८३ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झालेले आहे. यापैकी ४ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. दरवर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे कर्ज वितरण केले जात होते. यंदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती वाढली ते सप्टेंबर अखेरीस स्पष्ट होईल. (विशेष प्रतिनिधी)