‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:47 IST2025-09-30T19:47:22+5:302025-09-30T19:47:51+5:30

Congress News: राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या जीवाला असलेला गंभीर धोका पाहता त्यांना एसपीजी सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

'Strictly punish those who threatened to kill Rahul Gandhi, increase his security', Congress writes to Lok Sabha Speaker | ‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

मुंबई - काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी सत्ताधारी भाजपाचे प्रवक्ते प्रिंटो महादेवनने दिली असून, हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या जीवाला असलेला गंभीर धोका पाहता त्यांना एसपीजी सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान पुढे असे म्हणतात की, राहुल गांधी हे समाजातील वंचित, मागास, आदिवासी व अल्पसंख्याक समाजाच्या रक्षणासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. सामाजिक न्याय, एकता व बंधुत्वाची भाषा ते करतात. गांधी कुटुंबाला नेहमीच धोका राहिलेला आहे, आता तर गोळ्या घालण्याची थेट धमकी देण्यात आली आहे, ही अत्यंत गंभीर घटना असून याचे गांभीर्य पाहता राहुल गांधी यांच्यासह गांधी कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. अशा गुन्हेगारावर गंभीर कारवाई करा आणि लोकशाहीत अशा कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत असा कडक संदेश द्या. तसेच लोकप्रतिनिधींना निर्भयपणे त्यांचे कर्तव्य पार पाडता आले पाहिजे असेही नसीम खान यांनी म्हटले आहे.

Web Title : राहुल गांधी को धमकी: कांग्रेस ने कड़ी कार्रवाई, सुरक्षा बढ़ाने की मांग की।

Web Summary : कांग्रेस ने राहुल गांधी को धमकी देने वाले भाजपा प्रवक्ता के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। गांधी परिवार के लिए सुरक्षा बढ़ाने का आग्रह, लोकतंत्र और सामाजिक न्याय की रक्षा की आवश्यकता बताई।

Web Title : Congress demands strict action, increased security after Rahul Gandhi threat.

Web Summary : Congress seeks strict action against the BJP spokesperson who threatened Rahul Gandhi. They also urge increased security for the Gandhi family, citing continuous threats and the need to protect democracy and social justice advocates.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.