शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

निनावी पत्रावरून रचली खुनाची कहाणी--संजय पाटील खून खटला

By admin | Updated: September 26, 2014 23:33 IST

बचाव पक्षाचा युक्तिवाद : पोलिसांनी केला अंधळा तपास, --मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तपासाला गती

सातारा : ‘महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा खून झाल्यानंतर काही दिवसांतच निनावी पत्र आले. त्या पत्राचा आधार घेत पोलिसांनी कहाणी बनवली. पोलिसांनी डोळ्याला झापड लावून हा तपास केल्यामुळे आरोपींना हे भोगायला लागले असून, पोलिसांच्या तपासामध्ये अनेक विसंगती आहेत,’ असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील श्रीकांत जाधव यांनी केला.जिल्हा न्यायालयात शुक्रवारी बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा विसंगत तपास कसा केला, हे अ‍ॅड. जाधव यांनी अनेक मुद्द्यातून न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. खून झाल्यानंतर घटनास्थळी चप्पल पडली होती. त्या चप्पलवर मात्र रक्त नव्हते. ते चप्पल कोणाचे आहे, हे पुढे आले नाही. त्यामुळे एक चप्पल मारेकऱ्याचेही असावं. पोलिसांच्या तपासामध्ये संजय पाटील यांना समोरून गोळ्या घातल्या, त्यातील पुंगळ्या त्यांच्या स्कॉपिओ गाडीजवळ पडल्या होत्या, असे नमूद करण्यात आले. मात्र वास्तविक पिस्तुलातील पुंगळ्या दक्षिण बाजूला सापडल्या. काही साक्षीदारांचे म्हणणे आहे, संजय पाटील यांच्यावर डाव्या आणि उजव्या बाजूने गोळ्या झाडण्यात आल्या; परंतु समोरून पाच आणि पाठीमागून सहा गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असे शवविच्छेदन अहवालामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काळी मोटारसायकल घटनास्थळी होती, असे म्हणणे आहे. परंतु काही साक्षीदारांनी सांगितले आहे की, त्यावेळी सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी उभी होती. या खटल्यातील साक्षीदार वैभव पाटील हा मयत संजय पाटील यांच्या गावचा आहे. घटना घडल्यानंतर तो कृष्णा हॉस्पिटमध्ये गेला होता. काही दिवस तो पुण्यात राहिला होता. ओळख परेडमध्ये त्याने ओळख परेडला आलेले त्याचे मित्रच आहेत, हे त्याने मान्य केले. त्यामुळे पोलिसांनी ओळख परेडचा केवळ फार्स केला. वाळू व्यवसायातून तसेच पवनचक्कीच्या प्रकरणातून खून झाला असावा, असे गृहित धरून पोलिसांचा तपास केला. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तपासाला गतीमयताच्या भावाने निवेदन दिल्यानंतर तसेच निनावी पत्र आल्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली. मुंख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संजय पाटील यांच्या घरी भेट दिली. त्यानंतरच तपासाला गती मिळाली. या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले. संजय पाटील यांचा खून महाराष्ट्र केसरी म्हणून झाला नसून, अनेक गुन्ह्यातील एका व्यक्तिमत्त्वाचा हा खून आहे, अशी टिप्पणी बचाव पक्षाचे वकील श्रीकांत जाधव यांनी केली.