शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या घरात चोरी

By admin | Updated: June 17, 2014 23:49 IST

चोरटयांनी लाडू,शंकरपाळेही खाल्ले : ४५ हजार रुपयांचा माल लंपास

रिसोड : येथील तहसीलदार अमोल कुंभार यांच्या राहत्या घरी ६ ते १५ च्या मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी घ्चोरी करुन घरातील रोख रक्कमेसह ४५ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

याविषयी प्राप्त माहितीनूसार येथील तहसीलदार अमोल कुंभार हे हिंगोली रोडलगत गंगा मॉ विद्या मंदिराजवळ सतीश गुजरे यांच्या निवासस्थानी भाडयाने राहतात. तहसीलदारासाठी असलेल्या शासकीय निवासस्थानात मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यानेच तहसीलदार कुंभार हे भाडयाच्या घरात वास्तव्यास आहेत.मागील दहा दिवसांपासून तहसीलदार कुंभार त्यांच्या परिवारासह बाहेरगावी गेले होते. नेमका याच संधीचा फायदा घेत रविवारी मध्यरात्री चोरटयांनी घराच्या समोरील दवाजाचे कुलुप,कोंडा लोखंडी रॉडने तोडून घरात प्रवेश केला. बराच वेळपर्यंत चोरटयांनी घरातील प्रत्येक खोलीतील सामानात मौल्यवान वस्तुंचा शोध घेतल्याचे यावेळी त्यांनी मोठया प्रमाणात घरातील साहित्याच्या केलेल्या नासधुस व फेकफाकीवरुन दिसून येत होते. बराच वेळ पर्यंत घरात वावरताना त्यांनी साहेबांच्या घरातील लाडू व शंकरपाळे या गोड खाद्यपदार्थांवर चांगलाच ताव मारला.यावेळी चोरटयांनी चोरुन नेलेल्या साहित्यामध्ये सॅमसंग कंपनीचा एलईडी, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, लहान मुलांचे सोन्या चांदीचे दागिने, इतर वस्तुसह रोख दहा हजार रुपये असा एकूण ४५ हजार रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. दरम्यान सोमवारला सकाळी तहसीलदार अमोल कुंभार हे बाहेरगाववरुन घरी परत आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. झालेल्या चोरीची माहीती तहसीलदार कुंभार यांनी ठाणेदार राऊत यांना तात्काळ दिली. रिसोड पोलिसांनी चोरीचा पंचनामा करुन अज्ञात चोरटयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीचा छडा तातडीने लावण्याच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी वाशिम येथून ठसेतज्ज्ञ, श्‍वानपथकालाही पाचारण केले होते. चोरीचा तपास ठाणेदार सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो. निरिक्षक संजय गवई, पो.उप.निरिक्षक रवि हुंबेकर, पो.हे.कॉ.शांताराम राठोड, पो.कॉ.सचिन शिंदे करीत आहेत.