शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अजूनही दहा हजारांवर जोखमीच्या प्रसुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 18:34 IST

एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत सुमारे ९ हजार ९०० प्रसुती घरी झाल्या आहेत. तर २०१०-११ या वर्षात हे प्रमाण सुमारे दीड लाखाच्या पुढे होते.

- राजानंद मोरे  

पुणे : रुग्णालयात जाऊन सुरक्षित प्रसुती करण्याचे प्रमाण मागील दहा वर्षांत तब्बल १५ पटींनी वाढले आहे. मात्र, अजूनही पुरोगामी महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १० हजार प्रसुती जोखीम पत्करून रुग्णालयाबाहेर होत असल्याची स्थिती आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत सुमारे ९ हजार ९०० प्रसुती घरी झाल्या आहेत. तर २०१०-११ या वर्षात हे प्रमाण सुमारे दीड लाखाच्या पुढे होते.  

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून घरगुती प्रसुतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. विशेषत: ग्रामीण भागामध्ये आरोग्य केंद्रांमार्फत गर्भवती महिला व त्यांच्या कुटूंबियांमध्ये जनजागृती केली जात आहे. प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर जाऊन गर्भवती महिलांची नोंद ठेवली जाते. त्यांना रुग्णालयांमध्ये तपासणीला येण्यासाठी आग्रह केला जातो. खासगी रुग्णालयांकडूनही गर्भवती महिलांची माहिती संकलित केली जाते. आता शहरी भागासह ग्रामीण भागातही आरोग्य सुविधा वाढू लागल्याने घरगुती प्रसुतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, २०१०-११ या वर्षात महाराष्ट्रात घरगुती प्रसुतीचे प्रमाण सुमारे १ लाख ५९ हजार एवढे होते. त्यानंतर हे प्रमाण वेगाने कमी होत गेले आहे.  

वर्ष २०१२-१३ मध्ये घरगुती प्रसुतीचे प्रमाण पहिल्यांदाच एक लाखाच्या खाली आहे. यावर्षी सुमारे ६७ हजार महिलांची प्रसुती रुग्णालयाबाहेर झाली. मागील चार-पाच वर्षांमध्ये हा वेग पुन्हा मंदावल्याचे चित्र आहे. २०१६-१७ मध्ये सुमारे १५ हजार प्रसुती घरी झाल्या. पुढील चार वर्षात त्यामध्ये केवळ चार हजारांची घट झाली. २०१०-११ नंतर पाच वर्षात घरगुती प्रसुतीचे प्रमाण सुमारे सव्वा लाखाने कमी झाले होते. २०१९-२० मध्ये जानेवारी अखेरपर्यंत १३ लाख ८२ हजार महिलांनी रुग्णालयात प्रसुतीला पसंती दिली. तर घरगुती प्रसुतीचे प्रमाण ९ हजार ८६३ एवढे आहे. अजूनही ग्रामीण भागातील अनेक कुटूंबांमध्ये घरीच प्रसुती करण्यासाठी आग्रह केला जातो. काही ग्रामीण-आदीवासी भागामध्ये पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. काही वेळी प्रसुतीसाठी वेळेत रुग्णालयापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्यात घरगुती प्रसुतीचे प्रमाण दहा हजाराच्या जवळपास आहे.  

सुरक्षित प्रसुतीबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे

रुग्णालयातील सुरक्षित प्रसुतीबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागातील चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे घरगुती प्रसुतीचे प्रमाण वेगाने कमी झाले आहे. पण सध्याचा आकडाही कमी नाही. त्यासाठी आणखी खुप प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रामुख्याने ग्रामीण-आदीवासी भागात ही समस्या आहे.- डॉ. कुंदन इंगळे, सचिव, पुणे ऑबस्टेट्रिक अ‍ॅन्ड गायनॅकोलॉजिकल सोसायटी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेHealthआरोग्य