राज्याला मेडीकलच्या ५०० जागांचा फटका

By Admin | Updated: June 19, 2014 03:09 IST2014-06-19T03:09:04+5:302014-06-19T03:09:04+5:30

राज्य सरकारने उदासिनता दाखविल्याने गतवर्षी एमबीबीएस व डेंटल अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या वाढीव पाचशे जागांची मान्यता एमसीआय(मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडिया) ने रद्द केली आहे.

The state has suffered 500 seats in medical | राज्याला मेडीकलच्या ५०० जागांचा फटका

राज्याला मेडीकलच्या ५०० जागांचा फटका

पंकज जैैस्वाल, लातूर
शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने उदासिनता दाखविल्याने गतवर्षी एमबीबीएस व डेंटल अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या वाढीव पाचशे जागांची मान्यता एमसीआय(मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडिया) ने रद्द केली आहे. त्यामुळे २५६० जागांवरुन यंदा पुन्हा २०६० जागांसाठीच प्रवेश होतील.
केंद्रशासनाने ‘२०२० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य’ या संकल्पनेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात टप्प्या-टप्प्याने प्रवेश क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला़ १०० पर्यंत क्षमता असलेल्या महाविद्यालयांत ५० जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला़ तसे प्रस्तावही मागविण्यात आले़ त्यामुळे गतवर्षी राज्यातील १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रत्येकी ५० अशा ५०० जागा वाढवून मिळाल्या़ एमसीआयने महाविद्यालयांना त्रुटीची पुर्तता करण्याच्या अटीवर या वाढीव जागांना मान्यता दिली होती. परंतु राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्या अटींची पुर्तता करु शकले नाही. परिणामीे एमसीआयने या वाढीव जागांची मान्यता रद्द केली आहे़ त्यामुळे यंदा केवळ २०६० जागांवरच प्रवेश प्रक्रिया सुरु आहे़

Web Title: The state has suffered 500 seats in medical