कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 09:52 PM2021-05-30T21:52:17+5:302021-05-30T21:54:08+5:30

मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील जनतेशी संवाद. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. 

State government to take responsibility of children who lost their parents due to coronavirus pandemic uddhav thackeray | कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार : मुख्यमंत्री

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार : मुख्यमंत्री

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील जनतेशी संवाद.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. दरम्यान, या काळात कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. तसंच अनेक मुलं अनाथ झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचं पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार असल्याची माहिती मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. 

"कोरोनाची साथ खूप वाईट आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार आहे. कोरोनाच्या या लाटेत अनेकांनी आपले मित्र नातेवाईक गमावले. काहींनी आपली मुलं गमावली तर काही मुलांनी आपल्या पालकांना गमावलं. त्या मुलांना एकटं सोडणार नाही. यासंदर्भात लवकरच एक योजना तयार केली जाईल," असं मुख्यमंत्री म्हणाले. 

निर्बंध लादण्याचं काम नाईलाजानं

वर्ष दीडवर्ष अवघड असलेली म्हणजेच स्वत:वरील बंधनं अनुभवता आहात याबद्दल सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. "जी जनता आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर निर्बंध लादण्याचं कटू काम मला नाईलाजानं करावं लागत आहे. यावेळच्या कोरोनाबाधितांच्या सर्वोच्च संख्येचं शिखर सणासुदीपूर्वीच गाठलं आहे. गेल्या वेळी ते सणासुदीनंतर गाठलं होतं. म्हणावं तितकी संख्या अद्याप खाली आलेली नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२ टक्क्यांवर आलाय ही दिलायासादायक बाब आहे," असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी आपण कडक निर्बंध लावले आहेत. लॉकडाऊन केलेला नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसतंय. शहरी भागात संख्या कमी होतेय तर ग्रामीण भागात संख्या हलकी वाढताना दिसत आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Web Title: State government to take responsibility of children who lost their parents due to coronavirus pandemic uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.