शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 18:12 IST

प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. मराठा आरक्षणाबाबत कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही.

कोल्हापूर -  मराठा आरक्षणाबाबतसर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.  मराठा आरक्षणासंदर्भातसर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणाऱ्या यापूर्वीच्या वकिलांना बदलण्यात आले असल्याच्या वृत्तानंतर संभाजी राजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यासंदर्भात विचारणा केली आहे. तसेच आरक्षणाची अटीतटीची आणि अंतिम लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. अश्या परिस्थितीत ही एक गंभीर चूक सरकार कडून होत आहे, असे वाटत नाही का? मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील माहिती दिली गेली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खासदार संभाजीराजे म्हणतात की, ''सर्वोच्च न्यालायात मराठा आरक्षण संदर्भात भूमिका मांडणाऱ्या यापूर्वीच्या वकिलांना बदलण्यात आले आहे? जर हे खरे असेल, तर सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा देत असलेल्या मुकुल रोहतगी आणि नाडकर्णी यांसारख्या जेष्ठ वकिलांना बदलण्याचे कारण काय? आज अरक्षणसंबंधीत बाजू मंडण्याकरिता कोर्टात उपरोक्त वकील उपस्थित नव्हते. प्रचंड मोठ्या त्यागातून मिळत असलेल्या आरक्षणाची अटीतटीची आणि अंतिम लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. अश्या परिस्थितीत ही एक गंभीर चूक सरकार कडून होत आहे, असे वाटत नाही का? मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील माहिती दिली गेली आहे का?''  ''आज सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्याची तारीख होती. काल रात्री उशिरा माजी सरकारी वकील निशांत कटनेश्वरकर यांनी रोहतगी आणि नाडकर्णी यांना ब्रिफ केले. काही वेळाने, नवनियुक्त सरकारी वकिल  राहुल चिटणीस यांनी उपरोक्त वकिलांना न्यायालयात बाजू न मांडण्याची विनंती केली. त्याकरिता त्यांनी हे कारण दिलं की एवढे महागडे वकील कशाकरता लावायचे? त्यांना एवढी फी देण्याची काही आवश्यकता नाही. ते वकील केवळ महागडे आहेत हे कारण पुरेसे नाही. यापैकी माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी उच्च न्यायालयात सुद्धा मराठा आरक्षणाचा बाजू मांडली होती. त्यांच्या भूमिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकण्यात मोठी मदत झाली हे वास्तव आहे. नाडकर्णी हे देशाचे सध्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत. त्यांचं महत्व किती मोठं आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. या अनुभवी वकिलांना बाजूला करणे हे काही ठीक नाही, असेही संभाजीराजेंनी पत्रात म्हटले आहे.''सरकारकडे मराठा आरक्षणाची केस लढण्याकरीता पैश्यांची कमतरता असेल असे वाटत नाही. उलट सरकारने देशातले सर्वोत्तम वकिलांना आपली भूमिका मांडायला सांगितलं पाहिजे. या परिस्थितीत प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्वरित उपाय करण्याची आवश्यकता आहे,''अशी मागणीही खासदार संभाजीराजेंनी केली आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय