२०२४-२५ या वर्षीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा; सरकारने जाहीर केली मोठी यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:50 IST2025-11-28T19:49:48+5:302025-11-28T19:50:00+5:30
ज्येष्ठ पुरस्कार तीन लक्ष, युवा पुरस्कार एक लक्ष प्रत्येकी मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. सदरील पुरस्कार हे लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे आहेत.

२०२४-२५ या वर्षीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा; सरकारने जाहीर केली मोठी यादी
कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन,कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक,लोकनृत्य,लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय,वाद्यनिर्मिती,झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार,नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ,संगीत संयोजन,व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी आज केली.
ज्येष्ठ पुरस्कार तीन लक्ष, युवा पुरस्कार एक लक्ष प्रत्येकी मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. सदरील पुरस्कार हे लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे आहेत.
ज्येष्ठ पुरस्कार
नाटक - अरुण कदम (२०२५), कंठसंगीत- धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत- विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट- शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे(2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- मती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन- रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा आनंद गिरी (2024), संजीव भागवत (2025), लोकनृत्य- सुभाष नकाशे (2024), अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- मती शकुंतला नगरकर (2024), मती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- मती पदमजा कुलकर्णी (2024), मती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- युसुफ घडूलाल मूल्ला (2024), भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- धर्मा कांबळे (2024), मती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक( तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024), महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- अमर हळदीपूर (2024), कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024), उदय सबनीस (2025) .
युवा पुरस्कार :-
नाटक -मती तेज प्रधान (२०२4), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट-मती मधुरा वेलणकर (2024) शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024) भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन- जयवंत बोधले (2024) ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), मती अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- मती वृषाली दाबके (2024) संतोष भांगरे (2025), लोककला- संदिप पाल महाराज (2024), चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन- साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), मती गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- मती कस्तुरी देशपांडे (2024), सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), मती तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- मती प्रमिला लोदगेकर ( 2024), मती वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024), रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024), सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- लक्ष्मीकांत नाईक (2024), रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- मती रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट ( निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- प्रणाम पानसरे (2024), विराज भोसले (2025), संगीत संयोजन- अनुराग गोडबोले (2024), अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मती मेघना एरंडे (2024), मती समिरा गुजर(2025)
वरील सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी तसेच मा सांस्कृतिक कार्य मंत्री, आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे .