शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

सट्टाबाजाराचा अड्डा उद्ध्वस्त; ६ अटकेत

By admin | Updated: May 16, 2015 02:51 IST

आयपीएलच्या सामन्यांवर शहरात सुरू असलेला सट्टेबाजाराचा मोठा ‘हायटेक’ अड्डा गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी उद्ध्वस्त केला.

औरंगाबाद : आयपीएलच्या सामन्यांवर शहरात सुरू असलेला सट्टेबाजाराचा मोठा ‘हायटेक’ अड्डा गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी उद्ध्वस्त केला. सट्टाबाजार चालकासह शहरातील ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात शहरातील उच्चभ्रूंचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २२९ मोबाइल, ३६५ चार्जर, सुमारे ६ लाखांची रोकड व इतर साहित्य असा ५० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. मुख्य आरोपी नरेश धर्माजी पोतलवाड (३५, उस्मानपुरा), उद्योजक विनय नवीनचंद जैन (४९, सिडको), बिल्डर अनिल पोपटलाल मुनोत (५०, जिजामाता कॉलनी), मार्बलचे व्यापारी ललित हस्तिमल कोठारी (४९, सिडको), प्रफुल्ल अंबीरचंद राठी (४८, सुराणानगर) आणि ठेकेदार अलोक अशोक अग्रवाल (३०, सिडको) यांचा अटक केलेल्यांत समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर शहरात बुकी सट्टा घेत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेला खबऱ्याकडून १० दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यानंतर संशयितांवर, त्यांच्या मोबाइल कॉलवर नजर ठेवण्यात आली. अखेर उस्मानपुऱ्यातील रामगोविंद अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ५मध्ये राहणाऱ्या नरेश पोतलवाडच्या घरातून हा सगळा व्यवहार चालत असल्याचे गुरुवारी रात्री स्पष्ट झाले, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. आरोपी अलिशान रूममध्ये मोठ्या टीव्ही स्क्रीनवर आयपीएलची मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाताची मॅच पाहत सट्ट्याचे दिल्लीहून भाव घेऊन ते बुकींपर्यंत पोहोचविताना रंगेहाथ पोलिसांच्या हाती लागला. नरेश २८ बुकींसोबत मोबाइलवर सट्टा घेत होता. पोलिसांनी ते २८ मोबाइल क्रमांक कुणाचे आहेत आणि त्यांचे लोकेशन मिळविले. तेव्हा त्यापैकी सहा बुकी शहरातील असल्याचे स्पष्ट होताच मोबाइल लोकेशनच्या आधारे गुन्हे शाखा पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी अलोक अग्रवाल, प्रफुल्ल राठी, ललित कोठारी, अनिल मुनोत व विनय जैन यांना अटक केली. (प्रतिनिधी)