शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची बस आता असणार स्टीलची

By admin | Updated: February 10, 2015 02:45 IST

‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांना यापुढे आणखी चांगल्या दर्जाची सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुशांत मोरे, मुंबई ‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणा-या एसटी महामंडळाने प्रवाशांना यापुढे आणखी चांगल्या दर्जाची सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रथम अपघात कमी होण्याबरोबरच अपघातात मृत्यू आणि जखमींचे प्रमाण कसे कमी होईल यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी महामंडळाने एसटी बसची सध्याची असलेली अ‍ॅल्युमिनियमची बॉडी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅल्युमिनियमऐवजी एसटी बसेसची संपूर्ण बांधणी स्टीलची केली जाणार असून, त्यावर महामंडळाने कामही सुरू केले आहे. एसटीचे अपघात कमी करण्यासाठी महामंडळाकडून नेहमीच काहीना काही प्रयत्न केले जातात. चालकांना पुन:प्रशिक्षणाबरोबरच त्यांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी समुपदेशकांच्या संख्येत वाढही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु एवढे करूनही अपघात मात्र कमी होताना दिसत नाहीत. महामंडळाच्या बस अपघाताची आकडेवारी पाहिली असता २0१२-१३मध्ये एसटीचे ३ हजार ८0 अपघात झाले होते. यामध्ये ४५0 जणांचा मृत्यू झाला होता. तर २0१३-१४मध्ये अपघात आणि त्याचबरोबर बळींचीही संख्या वाढल्याचे दिसून येते. २0१३-१४मध्ये ३ हजार १५0 अपघात झाले असून, ५१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दोन्ही आर्थिक वर्षांत जखमींचेही प्रमाण जास्तच आहे. यावर महामंडळाकडून केलेल्या अभ्यासात एसटी बसची बॉडी अ‍ॅल्युमिनियमची असून, अपघात झाल्यास या बॉडीमुळे प्रवाशांचे प्राण वाचत नाहीत आणि प्रवासी गंभीर जखमीही होतात. त्यामुळे एसटी बसची संपूर्ण बॉडीच बदलण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, अ‍ॅल्युमिनियमऐवजी यापुढे स्टीलच्या बॉडीचा वापर करून बसची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम पाच हिरकणी बसेसमध्ये हा बदल केला जाणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत स्टीलची बॉडी असलेल्या बसेस ताफ्यात दाखल होतील.