शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

एसटी बसचे होणार ‘ट्रॅकिंग’ : नाशिकमध्ये प्रयोग यशस्वी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 7:00 AM

एसटीकडून राज्यात पहिल्यांदा नाशिकमध्ये ‘व्हीटीएस’ यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली..

ठळक मुद्देपुण्यासह मुंबई ठाण्यात लवकरच सुरूवातपुण्यासह मुंबई व ठाण्यात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार

पुणे : आधुनिकीकरणाकडे चाललेल्या महाराज्य राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)ने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्यादृष्टीने आणखी एक पाऊल टाकले आहे. प्रवाशांना लवकरच मोबाईल व बसस्थानकांवर बसची रिअल टाईम वेळ कळणार आहे. बसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) बसविणार आहे. नाशिकमध्ये यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आता पुण्यासह मुंबई व ठाण्यात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यातील नवीन तरतुदीनुसार सर्व परिवहन वाहनांमध्ये बसविणे ‘व्हीटीएस’ बंधनकारक केले आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. मागील काही महिन्यांपासून या प्रकल्पावर काम सुरू आहे. एसटीकडून राज्यात पहिल्यांदा नाशिकमध्ये ‘व्हीटीएस’ यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली. त्यामध्ये एसटीची रिअल टाईम वेळ, सध्याचे ठिकाण, वेग, वेळ आणि बस थांब्यावर थांबली की नाही याबाबतची चाचपणी घेतली. ही चाचणीमध्ये आलेले दोष दुर झाल्यानंतर आता महामंडळाने मुंबईमधील परेल आगार, ठाणे व पुण्यातील स्वारगेट व शिवाजीनगर आगारांमध्ये या यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागामध्ये पहिल्या टप्प्यात केवळ स्वारगेट व शिवाजीनगर आगारातील बसमध्ये ‘व्हीटीएस’ बसविले आहे. मागील पाच-सहा महिन्यांपासून हे काम सुरू होते. स्वारगेट आगारातील ११५ व शिवाजीनगर आगाराच्या १७० बसला ही यंत्रणा बसविली आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी केवळ बसस्थानकांवर  स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे स्टेशन बसस्थानकामध्ये मोठी डिजिटल स्क्रीन बसविण्याचे काम सुरू आहे. या स्क्रीनवर प्रवाशांना बसचे मार्ग, बस क्रमांक, बसचे सध्याचे ठिकाण, स्थानकात येण्याची वेळ याबाबतची माहिती मिळणार आहे. पण सुरूवातीला प्रमुख मार्गांसाठीच ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. --‘व्हीटीएस’चे फायदे -- बसची ‘रिअल टाईम’ वेळ कळणार- बसस्थानकावर डिजिटल स्क्रीनवर माहिती झळकणार- प्रवाशांना मोबाईलमधील अ‍ॅपवरही माहिती मिळणार- बसचे सध्याचे ठिकाण, पोहचण्याची वेळ समजणार- बस थांब्यावर थांबली की नाही हेही कळणार- चालकांवर नियंत्रण ठेवता येणार

.....

अ‍ॅपबाबत अनिश्चितताप्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर बसची ‘रिअल टाईम’ वेळ कळावी यासाठी मोबाईल अ‍ॅपही विकसित केले जात आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना राज्यातील कोणत्याही बसची सद्यस्थिती समजू शकेल. मात्र, सध्या मुंबईसह केवळ पुणे व ठाण्यामध्येही हा प्रकल्प राबविण्याची चर्चा आहे. त्यामुळे अ‍ॅपबाबत सध्या अनिश्चिता आहे. प्रवाशांना अ‍ॅप उपलब्ध करून दिल्यास सर्व बस त्यावर दिसणार नाहीत. केवळ ज्या गाड्यांना व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे, त्याच गाड्या दिसू शकतील. त्यामुळे हे अ‍ॅप आताच प्रवाशांना उपलब्ध होणार की नाही याबाबत अधिकाºयांनाही स्पष्ट माहिती नाही.

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावते