शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

होळी होणार सुखकर, ‘लालपरी’ सज्ज! कोकणवासीयांसाठी १९८ जादा फेऱ्या; ठाणे, मुंबईतून किती सुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 20:23 IST

ST Bus Extra Trips For Holi 2026: होळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांकरीता ‘लालपरी’ सज्ज झाली आहे

ST Bus Extra Trips For Holi 2026: होळी हा संपूर्ण देशात साजरा केला जाणारा विशेष सण आहे. मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रंगांचा सण म्हणून होळीची ओळख वेगळी आहे. कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शिमगोत्सवासाठी हजारो कोकणवासी आवर्जून गावी जातात. शिमगोत्सव, होळीसाठी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ‘लालपरी’ सज्ज झाली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुमारे १९८ जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळ करत असल्याचे म्हटले जात आहे. 

होळीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान, स्वस्त व्हावा यासाठी एसटी महामंडळाने वाढीव फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून तब्बल १९८ जादा फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. होळीनिमित्त हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू असून, या विशेष मोहिमेत सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन ठाणे आणि मुंबई विभागांतून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड विभागातून किती जादा फेऱ्या?

ठाण्यातून ७९ फेऱ्यांचे नियोजन असून, मुंबई विभागातून ६२ फेऱ्या नियोजित आहेत. २५ फेऱ्या गट आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पालघर विभागातून २४ फेऱ्या पूर्णपणे गट आरक्षणाच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहेत. रायगड विभागातून ३३ फेऱ्या होणार असून, त्या सर्व आरक्षित प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. या विशेष मोहिमेतील सर्वाधिक गर्दी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवशी अपेक्षित आहे. २८ फेब्रुवारी रोजी तब्बल ९१ फेऱ्या, तर १ मार्च रोजी ५९ फेऱ्या नियोजित केल्या आहेत, असे समजते.

दरम्यान, होळीच्या पूर्वसंध्येला गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एसटी प्रशासनाने या दिवसांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एकूण १९८ फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी, तर ५७ फेऱ्या गट आरक्षणासाठी राखीव आहेत. एसटी महामंडळाच्या या नियोजनामुळे होळीच्या सणात होणारी संभाव्य गैरसोय टळणार असून, प्रवाशांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. होळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांकरीता ‘लालपरी’ सज्ज झाली आहे, असे म्हटले जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Holi Travel: ST Buses Ready with 198 Extra Trips for Konkan

Web Summary : Maharashtra State Transport (ST) is deploying 198 extra buses from Mumbai, Thane, Palghar, and Raigad for Holi. Thane gets 79 trips, Mumbai 62. Most trips are planned for February 28 and March 1, ensuring convenient travel to Konkan.
टॅग्स :Holiहोळी 2025konkanकोकणstate transportएसटी