बसस्थानकात येत असतानाच एसटीचे ब्रेक फेल झाले, प्रवासी उभे असताना खांबाला धकडली म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:08 IST2026-02-18T11:07:03+5:302026-02-18T11:08:43+5:30

ST Bus Accident Yavatmal : आर्णी बसस्थानकात यवतमाळ-पुसद एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात. प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. वाचा सविस्तर अपडेट.

ST Bus Accident Yavatmal: The ST's brakes failed while approaching the bus stop, causing the bus to hit a pole while the passengers were standing... | बसस्थानकात येत असतानाच एसटीचे ब्रेक फेल झाले, प्रवासी उभे असताना खांबाला धकडली म्हणून...

बसस्थानकात येत असतानाच एसटीचे ब्रेक फेल झाले, प्रवासी उभे असताना खांबाला धकडली म्हणून...

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी बसस्थानकात आज काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. यवतमाळ ते पुसद या मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने बस थेट स्थानकातील खांबाला जाऊन धडकली. बसमध्ये प्रवासी असतानाच हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती, मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्रवाशांना उतरवण्यासाठी बस स्थानकात प्रवेश करत असताना चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे ब्रेक लागले नाहीत. बस अनियंत्रित झाल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखले, परंतु बस समोरील खांबाला जाऊन धडकली. या धडकेत बसच्या केबिनचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून या तांत्रिक बिघाडाबाबत विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली, ज्यामुळे एसटीच्या देखभालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दुसऱ्या एका अपघातात छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कार थेट हॉस्पिटलच्या तळघरात घुसल्याची घटना घडली आहे. यामध्ये चालक जखमी झाला आहे. ही कार थेट 'अॅडव्हान्स हॉस्पिटल'च्या अंडरग्राउंड (तळघर) भागात घुसली. या विचित्र अपघातात कार चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारचा वेग इतका प्रचंड होता की, हॉस्पिटलचे शटर तोडून ती आत शिरली. यामध्ये गाडीच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेमुळे हॉस्पिटलमधील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कारचा ब्रेक निकामी झाला की चालकाला डुलकी लागली, याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title : बस स्टेशन में प्रवेश करते ही ब्रेक फेल, खंभे से टकराई; कोई घायल नहीं।

Web Summary : यवतमाल में, स्टेशन पर बस के ब्रेक फेल हो गए, जिससे वह खंभे से टकरा गई। कोई घायल नहीं हुआ। अन्यत्र, संभाजीनगर में, एक कार अस्पताल के बेसमेंट में दुर्घटनाग्रस्त हो गई, जिससे चालक घायल हो गया। जांच जारी है।

Web Title : Bus brakes fail entering station, crashes into pillar; no injuries.

Web Summary : In Yavatmal, a bus's brakes failed at the station, hitting a pillar. No injuries were reported. Elsewhere, in Sambhajinagar, a car crashed into a hospital basement, injuring the driver. Investigations are ongoing.