शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

एसआरए इमारतींसाठी यापुढे निविदा

By admin | Updated: March 31, 2015 04:29 IST

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत इमारती उभारण्यासाठी यापुढे निविदा काढण्याचा शासनाचा विचार असल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत इमारती उभारण्यासाठी यापुढे निविदा काढण्याचा शासनाचा विचार असल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. गृहनिर्माण विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मेहता म्हणाले, आतापर्यंत ७० टक्के रहिवाशांची संमती मिळविणाऱ्या विकासकाला सध्याच्या पद्धतीनुसार एसआरएअंतर्गत इमारत उभारण्याचे काम दिले जाते. मात्र, आता निविदा काढून हे काम दिले जाईल. त्यामुळे स्पर्धा होईल आणि कामाचा दर्जाही चांगला असेल. मेहता यांनी असेही जाहीर केले की, म्हाडाच्या मालकीच्या जमिनींवर झालेल्या झोपडपट्टयांचा विकास सरकारने स्वत: करावा, असा निर्णय तीन वर्षांपूर्वी झाला होता; पण एकाही ठिकाणी काम झाले नाही. आता हे काम झोपडपट्टी विकास प्राधिकरणामार्फत (एसआरए) करण्यात येईल. म्हाडाच्या इमारती उभारल्या आणि एनओसी दिले की विकासक मोकळे होतात. यापुढे लाभार्थी राहायला जात नाही तोवर विकासकांची जबाबदारी राहील, असे मेहता म्हणाले. मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये आमदार फंडातून होणाऱ्या कामांमध्ये प्रचंड घोटाळे होत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली होती. त्यावर मेहता म्हणाले की, असे घोटाळे करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल. हे गंभीर प्रकरण आहे. अशा घोटाळ्यांची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी आपण विरोधी पक्षात असताना तत्कालिन मुख्यमंत्र्यांकडे केली होती. (विशेष प्रतिनिधी)