शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

राज्यात रब्बीवर अवकाळी पावसाचा सुखद शिडकावा; पिकांना संजीवनी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 13:18 IST

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात अनेक तालुक्यात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकांबरोबरच रब्बी पिकेही जळून गेली आहेत.

ठळक मुद्देजनावरांना काही दिवस का होईना हिरवा चारा उपलब्ध होणारपुणे विभागातील काही तालुक्यात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या टँकरच्या संख्येत वाढ

पुणे: राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे रब्बी पिके करपू लागल्याची स्थिती असतानाच गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाच्या शिडकाव्यामुळे पिकांना संजीवनी मिळली आहे. पुणे विभागातील काही तालुक्यात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या आहेत.त्यामुळे जनावरांना काही दिवस का होईना हिरवा चारा उपलब्ध होणार आहे.सांगली जिल्ह्यात आटपाडीमध्ये ६५.३० मि.मी.तर खानापूरमध्ये ३९.४० मि.मी पावसाची नोंद झाली आहे.परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात अनेक तालुक्यात दुष्काळ पडला आहे.काही तालुक्यात खरीपाच्या पिकांबरोबरच रब्बी पिकेही जळून गेली आहेत.त्यातच जनावरांनाही चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.महसूल विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्य शासनातर्फे दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आले आहेत.तसेच पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या टँकरच्या संख्येत वाढ होत चालाली आहे.त्यात गेल्या दोन दिवसात पुणे विभागातील पुणे,सांगली,सातारा,कोलापूर व सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने सुखद वातावरण निर्माण झाले आहे.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सांगली जिल्ह्यात काही तालुक्यात आवकाळी पाऊस झाला आहे.त्यात सोमवारपर्यंत (दि.१९) खानापूरमध्ये ३९.४०मि.मी.,आटपाडीत ५६.३० मि.मी., केडगावमध्ये ३१.६० मि.मी., पलूसमध्ये १२.८० मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. तर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात १८.४० मि.मी.,पंढरपूरमध्ये १२.९६ मि.मी., सांगोलामध्ये ८.७२ मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर येथे १२.५४ मि.मी. आणि भूदरगडमध्ये १८.०० मि.मी.पाऊस नोंदविला गेला.साता-यात काही ठिकाणी १ ते ७ मि.मी.पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात बारामती,इंदापूर व पुरंदर तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या मंगळवार (दि.२०)च्या अहवालानुसार साता-यात माण तालुक्यात १९.२९ मि.मी.पावसाची नोंद झाली.तर पाटण,कराड,कोरेगाव,खटाव,खंडाळा,वाई येथे ३ ते ७ मि.मी.पावसाची नोंद झाली.सांगलीत शिराळा येथे ११.३० मि.मी.पाऊस झाला असून मिरज,इस्लामपूर,तासगाव आणि कवठेमहाकाळ येथे १ ते ७ मि.मी.एवढा पाऊस झाला.पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यात यंदा केवळ ४० टक्के पाऊस झाला आहे.सोलापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात मोहोळमध्ये १७.९० मि.मी.,माळशिरस येथे १०.६० मि.मी., करमाळ्यात १६.८८ मि.मी. आणि अक्कलकोट येथे १३.०० मि.मी.तर दक्षिण सोलापूरात २०.९१ मि.मी.पावसाची नोंद झाली.त्याचप्रमाणे बार्शी,पंढरपूर,मंगळवेढा या भागातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.तर कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडीत १८.६७ आणि शिरोळमध्ये ९.४३ मि.मी.पावसाची नोंद झाली................अवकाळी पावसामुळे बहुतांश वेळा पिकांचे नुकसानच होते.मात्र,सुमारे अडीच महिन्यापासून काही भागात पाऊसाने पाठ फिरवली आहे.त्यामुळे पाण्याआभावी करपू लागलेल्या ज्वारीसारख्या पिकांना दिलासा मिळाला आहे.परंतु,काढणीला आलेल्या भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसdroughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र