शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

फवारणीने दोन शेतमजूरांच्या डोळ्याला गंभीर दुखापत, उपचारासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 5:55 PM

समुद्रपूर  तालुक्यातील उबदा येथे कपाशीवर फवारणी करताना दोन शेतमजूरांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी पैसे नसल्याने आर्थिक मदतीसाठी वणवण होत आहे.

 वर्धा -  समुद्रपूर  तालुक्यातील उबदा येथे कपाशीवर फवारणी करताना दोन शेतमजूरांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी पैसे नसल्याने आर्थिक मदतीसाठी वणवण होत आहे.    तालुक्यात सोयाबीन व कपाशी फवारणी करताना आतापर्यंत पन्नासच्या वर शेतकरी व शेतमजूरांना विषबाधा झाली आहे . उबदा येथील नितेश नामदेव शेटये ( वय ३२ ) हा शंकर फुलझेले यांच्या शेतात फवारणीसाठी गेला होता . फवारणी करताना अचानक डोळ्याला पाणी येण्यास सुरूवात झाली. थोडयावेळाने डोळे दूखू व  अंधूक दिसायला लागले. हिंगणघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार करिता गेला असता त्याला सेवाग्रामला उपचाराकरिता जाण्यास सांगितले .सेवाग्राम रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याला भरती होण्याकरिता सांगितले पण पुढील उपचाराकरिता पैसेच नसल्याने तो गावाकडे परत आला . मागिल तीन दिवसांपासून पैशासाठी वणवण फिरूनही हाती पैसे आले नाही . मजूरीसुद्धा बंद आहे . आई वडील यवतमाळ जिल्ह्यात राहतात.त्यामुळे त्याच्या समोर पैशाचा गंभीर प्रसंग उभा झाला आहे. डोळ्यांचा त्रास वाढल्याने त्याची चिंता अधिकच वाढली असून डोळे निकामी होण्याची शक्यता आहे . शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे . भारत नाना उके वय ३३ ह्यालाही फवारणी करून आल्यावर डोळ्यात पाणी येणे व डोळ्यात प्रचंड वेदना होणे सुरु झाल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ह्याच गावातील दोन शेतमजूरांना सुद्धा फवारणीतून विषबाधा झाली होती . पण उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाली आहे .तालुक्यातील समुद्रपूर ,गिरड ,कोरा परिसरात अशाच स्वरूपाच्या पन्नास वर घटना झाल्याने व उबदा येथील शेतमजूरांचे डोळ्यांनाच विषबाधा झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी