Speeding up farmers' debt relief activities; Sweet news can come anytime | शेतकरी कर्जमाफीसाठीच्या हालचालींना वेग; कधीही येऊ शकते गोड बातमी
शेतकरी कर्जमाफीसाठीच्या हालचालींना वेग; कधीही येऊ शकते गोड बातमी

मुंबई - सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केले असून तिन्ही पक्षांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यासाठीच्या हालचालींना वेग आल्याचे आला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची गोड बातमी कधीही येऊ शकते.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 12 डिसेंबर रोजी जुन्नर तालुक्यातील शिवसेनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवसेनेरीवरूनच उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला होता. असा उल्लेख इतिहासात आढळतो. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतात, असंही सांगण्यात येत आहे. 

शरद पवारांचा गुरुवारी वाढदिवस आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांसाठी ही भेट ठरू शकते. या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कायम आग्रही असतात. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यासंदर्भात त्यांच्याकडून एखादी घोषणा होऊ शकते. 

 

Web Title: Speeding up farmers' debt relief activities; Sweet news can come anytime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.