शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वेग आणि चपळता म्हणजे ‘टेबल टेनिस’

By admin | Updated: March 22, 2015 01:53 IST

इनडोअर क्रीडा प्रकारातील वेगवान खेळापैकी एक खेळ म्हणजे ‘टेबल टेनिस’. चपळता, वेगवान हालचाली आणि जबरदस्त नजर हे गुण असतील तर तुम्हाला हा खेळ खेळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

इनडोअर क्रीडा प्रकारातील वेगवान खेळापैकी एक खेळ म्हणजे ‘टेबल टेनिस’. चपळता, वेगवान हालचाली आणि जबरदस्त नजर हे गुण असतील तर तुम्हाला हा खेळ खेळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मुंबईमध्ये शालेय स्तरापासून ते व्यावसायिक गटापर्यंत विविध वयोगटांत टेबल टेनिसचे सामने किंवा स्पर्धा सातत्याने रंगत असतात.मुंबई शहर टेबल टेनिस संघटना आणि मुंबई उपनगर टेबल टेनिस संघटना अंतर्गत संपूर्ण मुंबईमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन होत असते. जिल्हास्तरीय स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा यामधून अनेक गुणवान खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्यात यशस्वी ठरतात. विशेष म्हणजे मुंबई स्तरावर होणाऱ्या स्पर्धा या चार डिव्हीजनमध्ये होतात. यामध्ये खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पुढच्या डिव्हीजनमध्ये बढती मिळत जाते. उदा. डिव्हीजन ‘फोर’मधील अव्वल दोन संघ किंवा खेळाडू हे पुढील मोसमामध्ये डिव्हीजन ‘थ्री’साठी पात्र ठरतात. त्याचवेळी डिव्हीजन ‘थ्री’मधील तळाच्या खेळाडूंना डिव्हीजन ‘फोर’मध्ये खेळावे लागते. यामुळेच प्रत्येक खेळाडू उच्च दर्जाचे टेबल टेनिस खेळण्यासाठी वर्षभर मेहनत घेऊन आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मुंबईकरांची नकळतपणे गुणवत्ता सुधारत जाते.वयाच्या ७-८ वर्षांपासून ‘टे.टे.’ खेळण्यास सुरुवात करू शकतो. खेळाडूची उंची व त्याची दृष्टी यावरदेखील बरेच काही अवलंबून असते. शालेय स्तरावर अनेक शालेय स्पर्धा आयोजित होत असल्याने लहान वयापासूनच स्पर्धात्मक टेबल टेनिसची सवय होते. १०, १२, १४, आणि १७ वयोगटामध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या खेळाडूंची जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय स्पर्धांसाठी निवड होते. महाविद्यलयीन पातळीवर देखील मुंबई विद्यापीठातर्फे अनेक स्पर्धा विभागानुसार घेतल्या जातात. त्यामुळे नवोदितांना स्पर्धात्मक खेळाचा चांगल्याप्रकारे अनुभव मिळत जातो.खेळाडू म्हणून संधी...इतर खेळांप्रमाणे या खेळातदेखील क्लब संस्कृती असल्याने प्रत्येक इच्छुक खेळाडूला टेबल टेनिसमध्ये कारकीर्द करण्याचा मार्ग मिळतो. सातत्याने विविध क्लब्सच्या वतीने आयोजित होणाऱ्या स्पर्धांतून व्यावसायिक स्पर्धांचा अनुभव खेळाडूंना होत असतो. यातूनच अनेक प्रतिभावंत खेळाडू घडत असतात. मुंबईमध्ये वर्षभर प्रत्येक वयोगटाच्या जिल्हस्तरीय स्पर्धांचे आयोजन होते. यातील अव्वल खेळाडू पुढे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवतात.नोकरीच्या संधी...राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकल्यावर खेळाडूंची सरकारकडून दखल घेतली जातेच; परंतु त्यासोबतच नोकरीचा मार्ग देखील मोकळा होतो. यामध्ये सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल ते म्हणजे रेल्वेचे. रेल्वे कायमच गुणवान खेळाडूंना संधी देत आल्याने आज बहुतेक खेळांमध्ये रेल्वे अग्रेसर आहे. टेबल टेनिसमध्ये देखील हेच चित्र आहे. त्याशिवाय एलआयसी, आरसीएफ, एअर इंडिया, देना बँक, आरबीआय यांसारख्या अनेक सरकारी व व्यावसायिक संस्था गुणवान व प्रतिभावंत खेळाडूंच्या शोधात असतात.