शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहने, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:06 PM

Oxygen Generation Projects : सद्यस्थितीत राज्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 1300 मे.टन/प्रतिदिन असून 1800 मे.टन एवढ्या ऑक्सिजनची मागणी आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची (Liquid Medical Oxygen) (LMO) मागणी वाढली आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने 'मिशन ऑक्सिजन स्वावलंबन' योजना हाती घेतली आहे.  या योजनेतंर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहने दिली जाणार असून त्याबाबतचानिर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर उद्योग विभागाने तत्काळ कार्यवाही केली. (Special Incentives to Industries for Oxygen Generation Projects, Information by Industry Minister Subhash Desai)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची (Liquid Medical Oxygen) (LMO) मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत राज्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 1300 मे.टन/प्रतिदिन असून 1800 मे.टन एवढ्या ऑक्सिजनची मागणी आहे. यापुढील काळात राज्यात 3000 मे.टन ऑक्सिजन (प्रति दिन) उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून उद्योग घटकांना प्रोत्साहने देण्याबाबत १२ मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.  

("मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून लोकांचे खिसे कापायचा उद्योग" )

प्रोत्साहने खालीलप्रमाणे आहेत :-1.    ऑक्सिजन निर्मिती तसेच सिलेंडर उत्पादन करण्याऱ्या उद्योग घटकांना प्रोत्साहने2.    नवीन गुंतवणूक तसेच विस्तारिकरण प्रकल्पांना प्रोत्साहने3.    राज्यातील सर्व तालुक्यांना एकच प्रवर्ग ग्राहय धरुन प्रोत्साहने4.    01.04.2021 पासून गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना देखील प्रोत्साहने5.    गुंतवणुकदाराने प्रोत्साहनासाठीचा अर्ज दि. 30.06.2021 पूर्वी सादर करणे अनिवार्य6.    प्रकल्प  त्वरीत कार्यान्वित होण्यासाठी गुंतवणुक कालावधी फक्त दोन वर्ष7.    विदर्भ, मराठवाडा, धुळे, नंदुरबार आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग क्षेत्रात पात्र गुंतवणुकीच्या कमाल 150 टक्के व उर्वरित महाराष्ट्रातील इतर क्षेत्राकरिता 100 टक्के इतकी प्रोत्साहने

8.    सर्वसाधारण प्रोत्साहने :-1.    100 टक्के ढोबळ राज्य वस्तू व सेवा करावर परतावा2.    मुद्रांक शुल्क माफी3.    विद्युत शुल्क माफी4.    विद्युत दर अनुदान रु. 2 प्रति युनिट / 5 वर्षासाठी5.    5 टक्के व्याज अनुदान (MSME प्रवर्गातील रु. 50 कोटी पर्यत भांडवली गुंतवणुक पर्यतच्या प्रकल्पांना.)

9.    विशेष प्रोत्साहने :-1.    25 MT – 50 MT उत्पादन निर्मिती क्षमता असलेल्या घटकांना दि. 31.12.2021 पूर्वी उत्पादनात गेल्यास विशेष भांडवली अनुदान. (50 MT पेक्षा जास्त दि. 30.06.2022 )2.    भांडवली अनुदान प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के ते 20 टक्के प्रमाणात रु. 5 कोटी  ते रु. 15 कोटीपर्यंत अनुज्ञेय. भांडवली अनुदान 5 समान हप्त्यातI.     विदर्भ, मराठवाडा, धुळे, नंदुरबार, रत्नागिरी व सिंधुदुर्ग क्षेत्रात स्थिर भांडवली गूंतवणुकीच्या 20 टक्के कमाल मर्यादा 10 ते 15 कोटी भांडवली अनुदानII.   उर्वरित इतर क्षेत्रामध्ये स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 10 टक्के कमाल मर्यादा रु. 5 ते 10 कोटी भांडवली अनुदान

(काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार- नाना पटोले)

10.    म.औ.वि.म. क्षेत्रामध्ये स्थापित होणाऱ्या घटकांना अतिरिक्त प्रोत्साहने :-1.    भूखंडाचे वाटप प्राधान्याने व सरळ पद्धतीने 2.    महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रामध्ये स्थापित होणाऱ्या घटकांना भुखंड दरामध्ये सवलतI.    विदर्भ,मराठवाडा, नाशिक विभाग (अपवाद सोडून), रत्नागिरी व सिंधुदुर्ग क्षेत्रास 50 टक्के व उर्वरित इतर क्षेत्रामध्ये 25 टक्के.3.    म.औ.वि.म. क्षेत्रात स्थापित होणाऱ्या घटकांना भूखंडाची किंमत सुलभ हप्त्यामध्ये 2 वर्षात देण्याचा पर्याय उपलब्ध.4.    हे धोरण दि. 31.12.2021 पर्यंत लागू.

11.    उद्योग सुलभता धोरणाच्या अनुंषगाने प्रकल्प त्वरीत कार्यान्वित होण्यासाठी 15 दिवसांत सर्व परवाने उपलब्ध करणे12.     या धोरणाची जलद गतीने अंमलबजावणी होण्यासाठी विकास आयुक्त (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीची स्थापना.

दरम्यान, कोरोना-19 प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ऑक्सिजनची मागणी 2300 मे.टन इतकी वाढण्याची शक्यता आहे. ऑक्सिजन निर्मिती व साठा वाढविणे तसेच ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहने दिल्यामुळे राज्याची सध्याची व भविष्यातील ऑक्सिजनची गरज निश्चितपणाने पूर्ण होईल. हा निर्णय जाहीर केल्यानंतर आमच्याकडे बऱ्याचशा उद्योजकांनी संपर्क साधला असून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास त्यांनी विशेष रुची दाखविली आहे, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनSubhash Desaiसुभाष देसाई