शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाची विशेष मोहीम, पाच हेक्टरचा पहिला टप्पा पूर्ण

By admin | Updated: August 18, 2016 23:58 IST

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने सोलापूर वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

काशिनाथ वाघमारे/ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 18 - नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने सोलापूर वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पाच-सहा टप्प्यांवर अर्थात ३० हेक्टरवर आठ उपयुक्त गवतांची लागवड करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे़ याचा पहिला टप्पा म्हणून ५ हेक्टरवर या गवतांची लागवड करून माळढोक वाढीच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे. नान्नज अभयारण्यातून पक्ष्यांनी पाठ फिरवली, त्यामागे अनेक कारणे आहेत़ त्यातील मुख्य कारण म्हणजे गवत आणि कीटकसंख्या़ पूर्वी या संपूर्ण क्षेत्रफळात बहुतांश उपयुक्त गवत होते़ कालांतराने उपयुक्त गवत कमी होत गेल्याने कीटकांची संख्या कमी होत गेली़ त्याचबरोबर काळवीट आणि ससे यांचीही संख्या रोडावत गेली़ खूप गांभीर्याने घेण्यासारखी ही बाब म्हणावी लागेल़ परिणामत: एकेकाळी शंभराच्या जवळपास माळढोक पक्ष्यांची संख्या होती, आता एक-दोनवर असल्याचा सर्वेक्षणातील अंदाज आहे़ निसर्गाच्या साखळीतील ही कडी सुस्थितीत ठेवण्यासाठी वनखात्याचे उपवन संरक्षक सुभाष बडवे यांनी कुरण व्यवस्थापनांतर्गत ह्यउपयुक्त गवतह्ण लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. उपयुक्त गवताच्या जाती़-* धामण* आंजन*डोंगरी*गिन्नी*पवन्या*दिनानाथ * युरोकोला * शेडाधारवाड, झाशीमधून मागवल्या बिया राष्ट्रीय चारा संशोधन केंद्र (धारवाड), झाशी (मध्यप्रदेश) येथून बियाणे मागवण्यात आले आहे़ सिद्धेश्वर वनविहाराच्या रोपवाटिकेत गवत रोपे तयार केली आहेत़ मागील २ वर्षांपासून या गवताची रोपे तयार करण्याचे काम सुरु आहे़ सध्या जवळपास ५ हजार रोपे लावण्यात आली आहेत़

गवताची वैशिष्ट्ये* या गवतावर अनेक कीटकांची पैदास होते़ त्यामुळे अनेक पक्ष्यांना सहजरित्या खाद्य उपलब्ध होते़ * गिन्नी नावाचे गवत दिवसभरात ४ इंचाने वाढते़ त्याची उंची ४-५ फूट वाढते़ याच्या बिया अनेक पक्षी खाद्य म्हणून खातात़ * काळवीट, ससे यांचे हे गवत मुख्य खाद्य आहे़ त्यामुळे त्यांची संख्यादेखील वाढवण्यास मदत होणार आहे़ * माळढोकचे मुख्य खाद्य टोळ-कीटकांचीही संख्या या गवतामुळे वाढणार आहे़

या विशेष गवतातून माळढोक पक्ष्यांसाठी खाद्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न सुटणार आहे़ हे गवत जवळपास ५ फूट वाढणार आहे़ या गवतावर कीटक वाढतील आणि या कीटकांचा माळढोक पक्ष्यांना खाद्य म्हणून उपयोग होणार आहे़ याबरोबरच वाढलेल्या गवतात लपण्यासाठी मदत होणार आहे.