शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

रब्बीच्या सव्वानऊ लाख हेक्टरवरील पेरण्या उरकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 11:13 IST

लांबलेल्या पावसाने रब्बीची कामे मंदावली

ठळक मुद्देसरासरीच्या १६ टक्के क्षेत्रावर पेरणी :ज्वारी, मका, हरभरा या पिकांच्या कामांना आता वेग आल्याची माहितीराज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार हेक्टर

पुणे : राज्यात रब्बीच्या ९ लाख ३९ हजार १३२ हेक्टरवरील (सरासरीच्या १६ टक्के) पेरण्या उरकल्या असून, पुणे विभागात सर्वाधिक साडेपाच लाख हेक्टरवरील पेरणीची कामे उरकली आहेत. ज्वारी, मका, हरभरा या पिकांच्या कामांना आता वेग आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. पाऊस लांबल्याने यंदा रब्बीच्या पेरण्यांची कामे मंदावली आहेत. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार हेक्टर आहे. गेल्या वर्षीच्या (२०१८-१९) रब्बी हंगामात याच काळात १३ लाख ४ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणीची कामे झाली आहेत. यंदा पाऊस लांबल्याने रब्बीची कामे उशिरा सुरु झाल्याने पेरण्यांचा वेग मंदावला आहे. पुणे विभागातील अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यात रब्बीचे सरासरी १७ लाख ८१ हजार ३४ हेक्टर क्षेत्र आहे. त्या पैकी ५ लाख ५६ हजार २८३ हेक्टरवरील (३१ टक्के) पेरणी झाली आहे. त्याखालोखाल लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या लातुर विभागात ११ लाख १४ हजार २३३ हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. त्या पैकी ९६ हजार ९६९ हेक्टरवरील (९ टक्के) कामे पूर्ण झाली आहेत. गव्हाचे १० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र असून, त्या पैकी अवघ्या १४ हजार ४७ हेक्टरवरील पेरणी झाली आहे. मक्याच्या सव्वादोन लाख हेक्टरपैकी ३० हजार ७९४ हेक्टरवर (१४ टक्के) पेरणी झाली. हरभºयाची १४ लाख ९० हजार २४७ हेक्टरपैकी १ लाख २० हजार ४३३ हेक्टरवरील पेरणी (४ टक्के) झाली आहे. सूर्यफूलाचे सरासरी क्षेत्र ४१ हजार ६३२ हेक्टर आहे. त्यापैकी ५४५ हेक्टरवरील (१ टक्का) पेरणीची कामे उरकली आहेत.  .........लष्करी अळीचा प्रादुर्भाव राज्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून, त्यापैकी ७ लाख ६६ हजार ४९९ हेक्टरवरील (२९ टक्के) पेरणीची कामे झाली आहेत. त्यातील ५ लाख ८८ हजार ६९८ हेक्टर क्षेत्र एकट्या सोलापूर जिल्ह्यात आहे. च्सोलापुरातील ज्वारीच्या २ लाख होक्टरवरील पेरण्या झाल्या आहेत. सोलापुरात रब्बी ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे कृषी विभागातील अधिकाºयांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस