शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पुत्राचे वक्तव्य राणेंना अडचणीत आणणारे

By admin | Updated: August 18, 2014 03:41 IST

काँग्रेस नेते नारायण राणे हे त्यांच्या मुलांमुळे अनेक वेळा राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत

मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे हे त्यांच्या मुलांमुळे अनेक वेळा राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. नीलेश राणेंनी शनिवारी राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने काँग्रेस आणि आघाडीच्या राजकारणात नारायण राणे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय कोकणातील त्यांच्या साम्राज्याला शिवसेनेने खिंडार पाडायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशामागे शिवसेनेची हीच रणनीती आहे़ या सर्व घडामोडीमुळेच राणे आधीच अडचणीत आहेत. नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांनी त्यांना वेळोवेळी अडचणीत आणल्याचे पाहावयास मिळाले आहे़ यापूर्वी जयवंत परब काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या कार्यालयावर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी केलेल्या हल्ल्यामुळे तसेच त्यानंतर चिंटू शेख गोळीबार प्रकरणात राणे अडचणीत आले होते. तर नितेश यांनीच गोव्यात टोलनाक्यावर केलेल्या मारहाणीचे प्रकरणही गाजले होते. नीलेश राणे यांनीसुद्धा यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा प्रचारादरम्यान नारायण राणेंच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. या सर्व प्रकारामुळेच रवींद्र फाटक, जयवंत परब, श्रीकांत सरमळकर, विजय वडेट्टीवार असे सर्व समर्थक राणेंना सोडून गेले. काहींनी पुन्हा शिवसेनाप्रवेश केला तर काहींनी राणे गट सोडला. एकूणच दोन्ही मुलांच्या वक्तव्य आणि वर्तणुकीमुळे राणे वारंवार अडचणीत येत असून, त्यामुळेच येती निवडणूक राणेंना कठीण जाईल, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.