‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:02 IST2025-08-26T07:02:26+5:302025-08-26T07:02:57+5:30

Dhule Crime News: धुळे शहरानजीकच्या लळिंग घाटात साधूच्या वेशात लूटमार करणाऱ्या ‘सफेरे’ टोळीला पकडण्यात मोहाडी पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली.

'Sona jaldi nikhalo, Varana mar dunga' became a monk and robbed | ‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले

‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले

धुळे -  शहरानजीकच्या लळिंग घाटात साधूच्या वेशात लूटमार करणाऱ्या ‘सफेरे’ टोळीला पकडण्यात मोहाडी पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली. २४ तासांत छडा लावत आरोपींना जेरबंद केले.
जळगाव जिल्ह्यातील खाचणे येथील ललिता नरेंद्र पाटील (३८) कुटुंबासह २२ ऑगस्टला दुपारी क्रूझर गाडीतून धुळ्याकडे जात होत्या. लळिंग घाटात साधूच्या वेशात उभ्या असलेल्या काही इसमांना पाहून त्यांच्या वाहनचालकाने गाडी थांबवली. पाटील कुटुंब तुळजापूर आणि पंढरपूर येथून देवदर्शन करून परत येत असल्याने, त्यांनी साधूंना आशीर्वाद घेण्यासाठी गाडी थांबविली. 

एका आरोपीने चाकू काढून महिलांना धमकावले
गाडी थांबविल्यानंतर साधूंनी संबंधित कुटुंबियांना पाणी मागितले आणि सर्वांना आशीर्वाद देण्याचे सांगितले. वाहनचालकासह सर्वजण खाली उतरले. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी ललिता पाटील यांची आई सुनंदाबाई आणि चुलत सासू सरलाबाई यांना खाली थांबवून बाकीच्यांना गाडीत बसण्यास सांगितले. 

त्यानंतर टोळीपैकी एका आरोपीने  अचानक चाकू काढून आणि धमकी दिली. ‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’, असे म्हणत धमकावले. घाबरलेल्या सुनंदाबाईंनी गळ्यातील दागिने काढून दिले.सासू सरलाबाई यांनीही त्यांच्याकडील दागिने दिले. या घटनेत आरोपींनी एकूण १ लाख ५ हजार रुपयांचे दागिने लुटले आणि कारमधून ते पळून गेले.

आरोपी उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील
पोलिसांनी संशयित आरोपी विक्की मोसमनाथ नाथसफेरे (२५), सौदागर बाबुनाथ नाथसफेरे (२४), गोविंदनाथ कल्लूनाथ नाथसफेरे (३५), जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे (२३), क्रांता मौसमनाथ नाथसफेरे (२५) यांना अटक केली. हे सर्व उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील आहेत.

Web Title: 'Sona jaldi nikhalo, Varana mar dunga' became a monk and robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.