देव ना करो माझी भविष्यवाणी खरी...! अजित पवारांच्या निधनाने...; ज्योतिषाने ५ डिसेंबरलाच दिला होता मोठा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 22:50 IST2026-01-28T22:47:24+5:302026-01-28T22:50:53+5:30
Social media viral prediction Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या निधनानंतर ज्योतिषी अंकित त्यागी यांची ५ डिसेंबर २०२५ ची भविष्यवाणी व्हायरल. २०२६ मध्ये मोठ्या राजकीय धक्क्याचा दिला होता संकेत. वाचा सविस्तर माहिती.

देव ना करो माझी भविष्यवाणी खरी...! अजित पवारांच्या निधनाने...; ज्योतिषाने ५ डिसेंबरलाच दिला होता मोठा इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असतानाच, आता एका ज्योतिषीय भविष्यवाणीची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अंकित त्यागी यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी केलेली एक भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा नेटकरी करत आहेत.
ज्योतिषी अंकित त्यागी यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक भाकीत वर्तवले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, "२०२६ हे वर्ष भारतीय राजकारणासाठी अत्यंत क्लेशदायक ठरेल. या वर्षात देशातील एका मोठ्या आणि प्रभावशाली राजनेत्याचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे." अजित पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक अतिशय वजनदार व्यक्तिमत्व होते. आज २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या अपघाती निधनामुळे, त्यागी यांनी वर्तवलेला इशारा तंतोतंत खरा ठरल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियावर सात आठवड्यांपूर्वीच अशी भविष्यवाणी झाली होती.... व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा...
योगायोग की संकेत?
यापूर्वीही अनेकदा राजकीय घडामोडींबाबत अशा प्रकारची भाकिते वर्तवली जातात. मात्र, अजित पवारांसारख्या कतृत्ववान नेत्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने लोक या भविष्यवाणीकडे गांभीर्याने पाहत आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या घटनेकडे केवळ एक 'दुर्दैवी अपघात' म्हणून पाहण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही अफवा किंवा तर्कवितर्कांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.