सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 08:20 AM2021-02-04T08:20:40+5:302021-02-04T08:21:04+5:30

Dhananjay Munde : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण शांत होत असताना करुणा शर्मा यांनी पोलिसात धाव घेतली.

Social Justice Minister Dhananjay Munde's troubles increase again | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

Next

मुंबई - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण शांत होत असताना करुणा शर्मा यांनी पोलिसात धाव घेतली. मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या घरात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुलांची भेट न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देऊन त्यांनी पोलिसांकडे कारवाई करण्याची विनंती केली आहे. 

करुणा यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून माझ्या दोन मुलांना त्यांच्या चित्रकुट बंगल्यात लपून ठेवले आहे. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हाकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाहीत. त्यात १४ वर्षांच्या मुलीचाही समावेश असून तिथे महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असतील. माझ्या विरोधातही ते मुलांना भडकवत आहेत. माझी मुलांसोबत  भेट घालून दिली नाहीतर २० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहे. (चित्रकुट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी द्या, मुंडे यांच्यावर कठोर  कारवाई करा, अशी मागणीही करुणा यांनी केली आहे. 

कोण आहे करुणा शर्मा?
मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर  आपली भूमिका मांडताना, करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात.  शर्माची मी सर्वतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे, असे नमूद केले होते.

Web Title: Social Justice Minister Dhananjay Munde's troubles increase again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.