शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 19:48 IST

चार तारखेला मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

आमची सहन करण्याची क्षमता संपली आता परिवर्तन होणार, गोरगरिबांच्या लेकराला न्याय देणारी ही लाट आहे, असे म्हणत,  मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. आता 3 तारखेला कोणत्या जागी कोणता उमेदवार हे ठरले जाईल, असे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. अर्थात ते उद्या या संदर्भात घोषणा करणार आहेत. महत्वाचे म्हणजे, जरांगे भाजप विरोधात उमेदवार देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आता, चार तारखेला मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, "लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच निवडणूक लढवण्याचा आणि उमेदवार देण्याचा अधिकार आहे. जरांगे हेदेखील उमेदवार उभे करणार असल्याचे समजते. मात्र, केवळ संकुचित भावनेने केवळ भारतीय जनता पार्टीसमोरच उमेदवार उभे केले गेले अथवा भाजपचे उमेदवार आहेत, तेथे पाडापाडीच्या उद्देशाने दुसऱ्या महाविकास आघाडीला समर्थन केले, तर जरांगेंचा बोलवता धनी कुणीतरी आहे, हे जे आम्ही पहिल्यापासून बोलत होतो, त्यावर शिक्कामोर्तब होईल." ते टीव्ही९ सोबत बोलत होते. 

जरांगे यांच्या हेतूसंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, "चार तारखेला फॉर्म मागे घेईपर्यंत, कोणत्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत, कोणत्या ठिकाणी नाहीत? ज्या ठिकाणी उभे आहेत, तेथे उमेदवार कोण आहेत? जेथे उभे करणार नाहीत, तेथे उमेदवार कोण आहेत? हे समोर आल्यानंतर, जरांगेंचा नेमका उद्देश काय? त्यांची निष्पक्षपाती भूमिका मराठा समाजासाठी आहे की, आता त्यांची भूमिका पूर्ण पणे राजकीय बनली आहे, हे महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल."

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी