शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

...तर राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; ठाकरे सरकारसमोर अधिवेशनाआधीच पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 06:06 IST

नागरिकत्व कायदा; वैधता ठरविण्याचा अधिकार मात्र न्यायालयालाच

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व कायद्याची (कॅब) अंमलबजावणी न करणाऱ्या महाराष्ट्रासह इतर कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. पूर्वीच अस्तित्वात असलेल्या कायद्यात केलेल्या बदलांची अंमलबजावणी करणे हे राज्यांना अनिवार्य आहे. केंद्र व राज्यांमधील संबंध या कायद्याच्या निमित्ताने फारच ताणले गेले तर राष्ट्रपती राजवटीच्या पर्यायाचा केंद्र सरकार विचार करू शकेल.

ज्येष्ठ घटनातज्ज्ञ आणि राज्याचे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांनी रविवारी लोकमतशी बोलताना हे मत व्यक्त केले. शिवसेनेने नागरिकत्व कायदा लोकसभेत संमत होण्यासाठी पाठिंबा दिला होता, पण राज्यसभेत विरोध केला होता. आता, या कायद्याबाबत न्यायालयाचा फैसला आल्यानंतर त्या बाबतची भूमिका ठरवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. काँग्रेसने या कायद्याला प्रचंड विरोध केला आहे. शिवसेनेनेही या कायद्यास विरोध करावा आणि त्याची अंमलबजावणी राज्यात करू नये, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर, घटनात्मक तरतुदी नेमक्या काय आहेत आणि कायद्याची अंमलबजावणी न केल्यास त्याचे राज्यावर काय परिणाम होऊ शकतात, याविषयी अ‍ॅड. अणे यांनी स्पष्ट मते मांडली. ते म्हणाले की, हा कायदा संसदेने मंजूर केलेला असल्याने त्याची अंमलबजावणी करणे हे राज्यांना अनिवार्य आहे. केंद्र आणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या विचारांचे पक्ष सत्तेत असणे आणि त्यातून येणारी भूमिकांची भिन्नता यातून कायद्याला राज्यांकडून विरोध होऊ शकतो; पण घटनेच्या आधारे विचार केला तर राज्यांना कॅबची अंमलबजावणी करावीच लागेल. मात्र, हा कायदा संसदेने पारित केलेला आहे. मात्र, तो वैध आहे की नाही हे न्यायालय ठरवेल. संसद किंवा राज्य ते ठरवू शकत नाही.कॅबची अंमलबजावणी राज्यांनी करावी यासाठी केंद्र सरकार काय काय करू शकते असे विचारले असता अणे म्हणाले की, केंद्र अधिसूचना काढू शकते. अस्तित्वातील कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. राज्यांनी अंमलबजावणीस नकार देण्याची भूमिका कायम ठेवली तर, त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकार घटनेच्या चौकटीत घेऊ शकते, असे ते म्हणाले.

या कायद्यावरून केंद्र व काही राज्यांमध्ये निर्माण झालेली तणावाची स्थिती केंद्र सरकारला टाळता आली असती. कायदा आणण्यापूर्वी सर्व राज्यांना केंद्राने विश्वासात घ्यायला हवे होते. कायद्याचा मसुदा राज्यांना पाठवायला हवा होता व त्यावर राज्यांची मते जाणून घ्यायला हवी होती, असे अ‍ॅड. अणे म्हणाले.

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीGovernmentसरकार