शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

...म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 7:58 PM

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यात भारत-अमेरिकेदरम्यान काही करार होण्याची शक्यता आहे.

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादलाही भेट देणार आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबादमधील आयोजित रोड शो दरम्यान त्यांच्या मार्गात असणाऱ्या झोपड्या दिसू नये, यासाठी अहमदाबाद महानगरपालिकेकडून ६०० मीटरची भिंत बांधण्यात येत आहे. यावरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या खास शैलीत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडे आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसे करायचे नाही, असे म्हणत टोला लगावला आहे. 

('मासिक पाळीची बातमी डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू नये म्हणून कोणती नवी भिंत उभारणार?')

याशिवाय, उलट भिंतीचा अडसर दूर करून कर्जत-जामखेडमधील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत एक व्हिडीओ रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कर्जत-जामखेडमधील ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक याविषयीची माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४-२५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा व्हाईट हाऊसने जाहीर केल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यात भारत-अमेरिकेदरम्यान काही करार होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार आहे. त्यामुळे अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला इंदिरा ब्रिजशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला अनेक झोपड्या लपविण्यासाठी मोठी भिंत उभारली जात आहे.  

विशेष म्हणजे, भिंत उभारण्यात येत असल्याचे महापौरांनाच माहीत नाही. मी भिंत पाहिलेली नाही. मला याबाबत काहीच माहीत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून विरोधकांकडून गुजरातमधील सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. 

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हॉस्टनमध्ये 'हाउडी मोदी' कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर आले होते. त्यावेळी भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी अबकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणाही केली होती. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारKarjatकर्जत