...मग गणेशोत्सव पाकिस्तानमध्ये साजरा करायचा का ? - उद्धव ठाकरे

By admin | Published: July 12, 2015 02:10 PM2015-07-12T14:10:42+5:302015-07-12T17:01:26+5:30

गणेशोत्सव हा हिंदूंचा सण असून तो भारतात साजरा करणार नाही तर मग काय पाकिस्तानमध्ये साजरा करणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

So do you celebrate Ganeshotsav in Pakistan? - Uddhav Thackeray | ...मग गणेशोत्सव पाकिस्तानमध्ये साजरा करायचा का ? - उद्धव ठाकरे

...मग गणेशोत्सव पाकिस्तानमध्ये साजरा करायचा का ? - उद्धव ठाकरे

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १२ - गणेशोत्सव हा हिंदूंचा सण असून तो भारतात साजरा करणार नाही तर मग काय पाकिस्तानमध्ये साजरा करणार का असा सवाल उपस्थित करत गणेशोत्सव दणक्यात साजरा व्हायला हवा असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुंबईच्या नालेसफाईवरुन चिंता व्यक्त करणा-यांनी तुंबलेल्या दिल्लीकडे लक्ष द्यावे, तिथे सत्ता कोणाची आहे असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.

रविवारी गणेशोत्सव समिती व महापालिकेच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सव मंडळांना पाठिंबा दर्शवला. रस्त्यावर बसून नमाज पढणा-यांविरोधात कोणीही कोर्टात गेले नाही, पण आपल्या उत्सवांविरोधात आपलीच लोकं कोर्टात जातात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव आहे तो दाऊदचा उत्सव नाही, तो मुर्दाडासारखा साजरा करणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. गणेशोत्सवाला विरोध करणा-यांनी गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक कार्याकडेही लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले.  

Web Title: So do you celebrate Ganeshotsav in Pakistan? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.