छोट्या वाहनांना टोलमुक्ती!

By Admin | Updated: June 2, 2015 04:19 IST2015-06-02T04:19:13+5:302015-06-02T04:19:13+5:30

राज्यात सरसकट टोलमुक्ती न करता कार, जीप, एसटी बस व स्कूलबस अशा लहान वाहनांना सर्व टोलनाक्यांवर लवकरच सूट दिली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील

Small vehicles toll free! | छोट्या वाहनांना टोलमुक्ती!

छोट्या वाहनांना टोलमुक्ती!

मुंबई : राज्यात सरसकट टोलमुक्ती न करता कार, जीप, एसटी बस व स्कूलबस अशा लहान वाहनांना सर्व टोलनाक्यांवर लवकरच सूट दिली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
१ जूनपासून राज्यातील १२ टोलनाके कायमस्वरूपी बंद, तर ५३ टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोलमुक्ती मिळाली आहे. त्याकरिता दरवर्षी ४२५ कोटी रुपये याप्रमाणे २०४० सालापर्यंत ९ हजार कोटी रुपये राज्य सरकार टोल कंत्राटदारांना मोजणार आहे. आता कोल्हापूर येथील नऊ तर मुंबई एंट्री पॉइंटचे पाच टोलनाके येथे छोट्या वाहनांना टोल भरावा  लागत आहे. मुंबई एंट्री पॉइंटचे पाच टोलनाके पूर्णपणे बंद करायचे झाले तर दरवर्षी ३ हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागतील. त्यामुळे या टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी द्यायची झाली तर दरवर्षी ८०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारला सोसावा लागेल, असे सांगितले जाते. मात्र हा भार कमी असल्यास तात्काळ छोट्या वाहनांचा टोल बंद केला जाईल, असे पाटील म्हणाले.
छोट्या वाहनांना टोलमुक्ती
टोलमाफीचा मार जनतेलाच
सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ते बांधणी, दुरुस्ती याकरिता मागील आर्थिक वर्षापर्यंत २९०० कोटी रुपये तरतूद केली जात होती. यंदा ही तरतूद ८०० कोटी रुपयांनी वाढवून ३७०० कोटी केली. ५३ टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी दिल्यावर लागणारे ४२५ कोटी पुरवणी मागणीद्वारे मिळावेत याकरिता प्रयत्न सुरु आहे. मात्र वित्त खाते वाढलेल्या तरतुदीमधून हा खर्च भागवण्याचा आग्रह धरीत आहे. वित्त खात्याचे मत मान्य झाले तर शेवटी रस्ते विकासाची तरतूद टोलमाफीकरिता कंत्राटदारांना द्यावी लागेल, अशी शक्यता दिसत आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Small vehicles toll free!