सोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:31 AM2020-10-01T03:31:17+5:302020-10-01T03:32:06+5:30

केंद्रीय गृह विभागाची अधिसूचना जारी; दीड वर्षापासून होते प्रलंबित

Sixteen ‘Mapose’ became IPS officers | सोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी

सोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी

googlenewsNext

मुंबई : गेल्या सुमारे दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्य पोलीस सेवेतील १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) समावेश होण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. केंद्रीय गृह विभागाने त्यांच्या निवडीबाबत बुधवारी अधिसूचना जारी करण्यात आली.

गृह विभागाकडून प्रस्ताव पाठविण्याबाबत होत असलेल्या सुस्ताईबद्दल ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठवित पाठपुरावा केला होता. सहा अधिकाऱ्यांना २०१७ तर दहा अधिकाºयांना २०१८ च्या निवड यादीत समाविष्ट करण्यात आले. त्यांची नावे अशी : (२०१७ निवड यादी) सदानंद वायसे - पाटील, अविनाश बारगळ, एन. टी. ठाकूर, शिरीष सरदेशपांडे, नितीन पवार व दिगंबर प्रधान.

* २०१८ - निवड यादी - शीला डी. साईल, पी. आर. पाटील, तुषार दोशी, बी. बी. पाटील (वाघमोडे), सदानंद बुरसे, सुनीता साळुंखे - ठाकरे, श्रीकांत परोपकारी, सोमनाथ घारगे, रवींद्रसिंह परदेशी व पुरुषोत्तम कराड.

Web Title: Sixteen ‘Mapose’ became IPS officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.