शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

दारुच्या नशेत गडकिल्ल्यावर जाणाऱ्यांना सहा महिने कैद; राज्य शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 2:53 AM

गडकिल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्या तळीरामांवरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास सहा महिन्यांपर्यंत कैदेची शिक्षा आणि १० हजार रुपये इतका दंड आकारला जाईल.

मुंबई : दारूच्या नशेत गडकिल्ल्यांवर जाऊन गैरवर्तन करणाऱ्यांना यापुढे सहा महिन्यांपर्यंत कैदेची शिक्षा आणि १० हजार रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे. या बाबतचा आदेश शनिवारी राज्याच्या गृहविभागाने शनिवारी काढला.

सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गैरशिस्तीने वागल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५ अंतर्गत शिक्षेची जी तरतूद आहे ती आता गडकिल्ल्यावर दारु पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांसाठीही लागू करण्यात आली आहे.

या तरतुदीनुसार आता गडकिल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्या तळीरामांवरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास सहा महिन्यांपर्यंत कैदेची शिक्षा आणि १० हजार रुपये इतका दंड आकारला जाईल. ही शिक्षा सहा महिन्यांपर्यंतची असली तरी ती तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी देता येणार नाही आणि समजा दिली तर त्याची कारणे न्यायालयाने द्यावी लागतील. ही शिक्षा पहिल्या अपराधासाठी असेल.नंतरच्या अपराधासाठी एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा आणि १० हजार रुपये इतक्या दंडाची शिक्षा असेल. शिक्षेच्या या तरतुदींचा उल्लेख असलेला फलक पुरातत्व विभागामार्फत किल्ल्यावर दर्शनी भागात लावणे अनिवार्य असेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीFortगडMaharashtraमहाराष्ट्र