शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 06:01 IST

परभणीतील पोलिस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने प्रकरण वादात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: परभणीतील पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिस महासंचालकांना आठ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा केली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी युक्तिवाद करत एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली होती, त्यानुसार खंडपीठाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. 

सुधीर हिरेमठ असतील एसआयटीचे अध्यक्ष

  • या एसआयटीचे अध्यक्ष म्हणून सुधीर हिरेमठ, (विशेष पोलिस महानिरीक्षक, सीआयडी, पुणे), तर सदस्य म्हणून अभिजित धाराशिवकर (पोलिस अधीक्षक, सीआयडी, नागपूर), अनिल गवाणकर (पोलिस उपअधीक्षक, सीआयडी, नांदेड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
  • सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते, त्याविरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात पीडितांच्या बाजूने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने खंडपीठाचा आदेश कायम ठेवला होता.

सुरुवातीपासूनच एसआयटी स्थापन व्हावी, अशी आग्रही मागणी वेळोवेळी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर आता एसआयटी स्थापन झाली, त्याबाबत समाधानी आहे. लवकर चौकशी पूर्ण होऊन न्याय मिळावा.- विजयाबाई सूर्यवंशी, मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई

टॅग्स :Parbhani Policeपरभणी पोलीसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर