सर अभिनंदन चांगले काम केले !

By Admin | Updated: June 1, 2014 01:03 IST2014-06-01T01:03:29+5:302014-06-01T01:03:29+5:30

सात वर्षापूर्वी लाच घेताना रंगेहात सापडलेल्या नागपूर सुधार प्रन्यासचा निलंबित अधीक्षक अभियंता नानक वासवानी याला पुन्हा सेवेत घेण्याचा आटापिटा सुरू आहे. विश्‍वस्तांच्या या निर्णयाविरोधात शहर

Sir congratulations good work! | सर अभिनंदन चांगले काम केले !

सर अभिनंदन चांगले काम केले !

राष्ट्रवादीची गांधीगिरी :  सभापतींचे पुष्पगुच्छ देऊ न उपहासात्मक स्वागत
नागपूर : सात वर्षापूर्वी लाच घेताना रंगेहात सापडलेल्या नागपूर सुधार प्रन्यासचा निलंबित  अधीक्षक अभियंता नानक वासवानी याला पुन्हा सेवेत घेण्याचा आटापिटा सुरू आहे.   विश्‍वस्तांच्या या निर्णयाविरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी  गांधीगिरी करीत  शनिवारी पक्षाचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात  नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांना  पुष्पगुच्छासह निवेदन सादर  केले. परिसरात वासवानीच्या विरोधात घोषणाबाजी केली.
 विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत सर्व सहमतीने वासवानी याला  पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव आणला  आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना हैराण करणार्‍या भ्रष्ट  वासवानी याला बडतर्फ करण्याचे सोडून त्याला पुन्हा सेवेत पुनस्र्थापित करीत असल्याची माहिती  लोकमतमधील प्रकाशित वृत्तातून मिळाली. बातमी वाचल्यानंतर राहवले नाही म्हणून आपण  सवार्ंचे अभिनंदन करण्यासाठी आल्याचे  पाटील यांनी दराडे यांच्या निदर्शनास आणले.   नागपुरातील सर्वसामान्य माणसाला वेठीस धरणार्‍या  भ्रष्ट वासवानीला नासुप्र सेवेत परत घेण्याचे  कारणच काय. का म्हणून या भ्रष्टाचार्‍याला सेवेत पुन्हा घेण्याचा आटापिटा विश्‍वस्तांनी  चालविला आहे. सभापती म्हणून तुम्हीही याकडे दुर्लक्ष का करीत आहात, असा सवाल अजय  पाटील यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.
वासवानीला पुन्हा सेवेत घेणे म्हणजे भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचाच प्रकार आहे. एवढेच  नव्हे तर नासुप्र सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.  वासवानी याने क ोट्यवधीची मालमत्ता जमविली आहे. त्याचेशी  काही राजकीय नेते व बिल्डर्सचे  हितसंबंध गुंतलेले आहेत. तो कारागृहातून बाहेर यावा, यासाठी काही बिल्डर्स सक्रिय झाले होते,  अशी माहिती पाटील यांनी दिली. शिष्टमंडळात मनपातील राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रगती पाटील,  नगरसेवक दुनेश्‍वर पेठे, सीमा राऊत, विजय तालेवार, राजेश कुंभलकर, शरद नागदिवे, प्रशांत  बनकर, महेंद्र भांगे, राखी गाडगे, चरणजितसिंग हरविंदरसिंग  मुल्ला, देवीदास घोडे, सुनील राऊ त,  ¬षी कारोडे, विजय शेंडे, तनुज चौबे, श्याम चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Sir congratulations good work!