शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजाची ऐतिहासिक तोफ सापडली!

By admin | Updated: December 26, 2014 00:06 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात विकली जाणार होती तोफ; शेतात पुरली होती तोफ, चार आरोपी गजाआड.

सिंदखेडराजा (बुलडाणा) : माँ जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील शासकीय वस्तु संग्रहालयातून चोरी झालेली ८५ किलो वजनाची पंचधातूची तोफ पोलिसांनी शोधली असून, ही तोफ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याची तयारी आरोपींनी चालविली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या चौकशीतून पुरातन वस्तु खरेदी-विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.बुलडाणा जिल्ह्यातील आडगावराजा येथील भुईकोट किल्ल्याचे २0 वर्षापूर्वी उत्खनन केले असता, तेथील १३ एकर परिसरात पंचधातूच्या ८ तोफा सापडल्या होत्या. या तोफा सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील शासकीय वस्तु संग्रहालयात ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ८५ किलो वजनाची पंचधातूची तोफ २२ डिसेंबर रोजी रात्री चोरी झाली होती. ही तोफ चोरण्याचा कट मुख्य आरोपी बाळु म्हस्के याने रचला होता. निमगाव वायाळ येथील ट्रॅक्टर चालक आकाश पंजाबराव निलक, दुसरबीड येथील शंकर शिवाजी केवट आणि बाळू म्हस्केचा सख्खा भाचा सिद्धार्थ काळे हेदेखील कटात सहभागी होती. या आरोपींनी १९ डिसेंबर रोजी राजवाड्यात जावून तोफ चोरीची रंगीत तालीमही केली होती. २२ डिसेंबर रोजी तिघे पुन्हा एकत्र आले आणि नियोजित कटानुसार रात्री १२.३0 वाजता राजवाडयातून तोफ लंपास केली. त्यानंतर ही तोफ त्यांनी शिवणीटाका रोडवरील नगरपालिका हद्दीतील एका शेतात पुरून ठेवली. त्यासाठी केलेले खोदकाम कुणाच्या लक्षात येऊ नये, यासाठी तोफ पुरलेल्या जागेवर सोयाबीनचे कुटार जाळले; मात्र पोलिसांनी ट्रॅक्टरच्या चाकाच्या खुणांचा मागोवा घेत शेतातील जागेचा शोध लावला. त्या जागेवर खोदकाम केले असता, पोलिसांना तोफ सापडली. पोलिसांनी शिताफीने तपासचक्र फिरवून, मुख्य आरोपी बाळू जगन्नाथ म्हस्के, निमगाव वायाळ येथील ट्रॅक्टरचालक आकाश पंजाबराव निलक, दुसरबीड येथील शंकर शिवाजी केवट या तिघांना अटक केली असून बुधवारी दूपारी २ वाजता अटक केली. चवथा आरोपी सिद्धार्थ काळे याला रात्री ८ वाजता अटक केली. आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३८0 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. *आंतरराष्ट्रीय बाजारात तोफेची किंमत ५0 लाख रूपयेराजवाड्यातून चोरलेली तोफ १६ व्या शतकातील होती. तिची किंमत पुरातत्व विभागाचे अभिरक्षक एम.वाय. कामठे यांनी केवळ ४५00 रुपये काढली होती. प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची किंमत ५0 लाख रूपयांपेक्षाही जास्त असल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू म्हस्के याने कटात सहभागी इतर आरोपींना मदत करण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी ५ लाख रूपये कबुल केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्यासाठी बाळू म्हस्के याने वापरलेल्या नेटवर्कचा शोध आता पोलिस घेत आहेत.