Corona Vaccine: “भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल, मी सर्वांना हमी देतो”: अदर पुनावाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 02:08 PM2021-06-28T14:08:38+5:302021-06-28T14:09:26+5:30

Corona Vaccine: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी दिलासादायक ट्विट केले आहे.

sii adar poonawalla assures who took covishield vaccine not face problem travelling european union | Corona Vaccine: “भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल, मी सर्वांना हमी देतो”: अदर पुनावाला

Corona Vaccine: “भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल, मी सर्वांना हमी देतो”: अदर पुनावाला

Next

मुंबई: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आताच्या घडीला तरी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे. भारतासह जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतात बहुतांश नागरिकांना सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्डची लस दिली जात आहे. मात्र, या लसीमुळे परदेशी जाणाऱ्या प्रवाशांच्या समस्या वाढताना दिसत आहे. कारण कोव्हिशिल्ड लसीला युरोपीय संघांच्या देशांमध्ये मान्यता नसल्याचे समोर येत आहे. मात्र, याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी दिलासादायक ट्विट केले आहे. याबाबत मी सर्वांना हमी देतो, असे अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. (sii adar poonawalla assures who took covishield vaccine not face problem travelling european union)

कोव्हिड ग्रीन पाससाठी पात्रता निकषांमधून युरोपियन युनियनने कोव्हिशिल्ड लसीला वगळले आहे. युरोपीयन संघात सहभागी असलेल्या अनेक देशांनी डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे. युरोपीय देशांमध्ये कामासाठी, पर्यटनासाठी वा अन्य कारणांसाठी जाणाऱ्यांना डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट आवश्यक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, कोव्हिशिल्ड लसीला मान्यता नसल्यामुळे युरोपीय संघातील देशांमध्ये जाताना भारतीयांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जात आहे. मात्र, हा मुद्दा उपस्थित होताच सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने याची दखल घेत एक दिलासा देणारे ट्विट केले आहे. 

मी सर्वांना हमी देतो

कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या बर्‍याच भारतीयांना युरोपियन युनियनमधील देशांमध्ये प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे मला समजले आहे. मी सर्वांना हमी देतो, की मी हे प्रकरण उच्च स्तरावर उचलून धरले आहे. संबंधित देशांसोबत नियामकांसह राजनैतिक पातळीवर लवकरच ही समस्या मिटण्याची आशा आहे, असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. १ जुलैपासून युरोपियन देशांमध्ये डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट अमलात आणला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर!

युरोपीय संघाची चार व्हॅक्सिनना मान्यता

युरोपीय मेडिसिन एजन्सीने आतापर्यंत चार कोरोना लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये फायझर, मॉर्डना, एस्ट्राजेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सनचा समावेश आहे. या चार लसींचे डोस घेतलेल्यांनाच युरोपीय संघांच्या देशांमध्ये प्रवेश मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाने विकसित केलेली आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेल्या कोव्हिशिल्ड लसीला मात्र युरोपीय संघात मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय प्रवाशांच्या प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.   

पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप

दरम्यान, भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील व्यक्तींना कोव्हिशिल्डची लस देण्यात येत आहे. आकडेवारीनुसार, एकूण लसीकरणांतर्गत ८८ टक्के कोव्हिशिल्डच्या लसी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कोव्हिशिल्ड लसीला जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO मान्यता दिली आहे.
 

Web Title: sii adar poonawalla assures who took covishield vaccine not face problem travelling european union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.