Jammu and Kashmir: पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:32 PM2021-06-28T12:32:41+5:302021-06-28T12:33:31+5:30

Jammu and Kashmir: पुलवामा जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या माजी विशेष पोलीस अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या केली.

terrorist killed former spo jammu kashmir police and his wife at their home in pulwama | Jammu and Kashmir: पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप

Jammu and Kashmir: पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप

Next

अवंतीपुरा: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांशी केलेल्या चर्चेच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी तीन हल्ले करून काश्मिर खोरे हादरवून सोडले. आता पुन्हा एकदा पुलवामा जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या माजी विशेष पोलीस अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या केली. या हल्ल्यात त्यांची पत्नी आणि मुलीचाही करुण अंत झाला. यानंतर आता पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (terrorist killed former spo jammu kashmir police and his wife at their home in pulwama) 

पुलवामा जिल्ह्यातील एका गावात जम्मू-काश्मीर पोलिसांतील माजी विशेष पोलीस अधिकारी फैय्याज अहमद यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघींचाही मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. पाणावलेल्या डोळ्यांनी गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.

हवाईतळावर डागली दोन ड्रोनमधून स्फोटके 

हल्लेखोरांचा शोध सुरू

या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे या हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. श्रीनगर येथील बर्बरशाह भागात दहशतवाद्यांनी शनिवारी सुरक्षादलांवर ग्रेनेड हल्ला केला होता. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तसेच एका महिलेसह तीन जण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी येथील सीआरपीएफ आणि पोलिसांच्या एका संयुक्त पथकावर ग्रेनेड हल्ला केला होता. 

दरम्यान, जम्मू येथील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावर दोन ड्रोनमधून स्फोटके टाकण्यात आली. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहिल्यांदाच मानवरहित ड्रोनचा वापर केला, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यात भारतीय वायुदलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. पहिला स्फोट शहरालगच्या सतवारी भागातील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावरील अत्यंत सुरक्षित एक मजली इमारतीत तर  दुसरा खुल्या जागेत झाला. ड्रोनने कोठून उड्डाण केले आणि त्यांचा मार्ग कसा होता, याचाही तपास केला जात आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून जम्मू विमानतळाचे हवाई अंतर १४ किमी आहे. 
 

Web Title: terrorist killed former spo jammu kashmir police and his wife at their home in pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.