शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शेवटपर्यंत मुलीसाठी लढले, पण..; श्रद्धा वालकरच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:45 IST

Shradha Walkar Murder Case: बहुचर्चित श्रद्धा वालकर प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरुन सोडले होते.

Sharadha Walkar News: दिल्लीसह संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तेव्हापासून श्रद्धाचे वडील अंत्यसंस्कारासाठी आपल्या मुलीचा मृतदेह देण्याची मागणी करत होते. पण, शेवटपर्यंत त्यांची इच्छा अपुरीच राहिली. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचे आज मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलीच्या हत्येनंतर ते नैराश्येत गेले होते. 

श्रद्धा प्रकरण साकेत न्यायालयात प्रलंबित श्रद्धा वालकरचे उर्वरित शरीर गेल्या अडीच वर्षांपासून दिल्लीच्या मेहरौली पोलीस ठाण्यातील गोदामात एका छोट्या पेटीत बंद आहे. साकेत न्यायालय हे मेहरौली पोलीस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. या न्यायालयात 1 जून 2023 पासून म्हणजेच, गेल्या दोन वर्षांपासून श्रद्धा प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे. या सुनावणीदरम्यान अनेकवेळा श्रद्धाच्या शरीराचे तुकडे न्यायालयात हजर केले जायचे.

श्रद्धाची काही हाडे शिल्लक श्रद्धाचे वडील विकास वालकर जवळपास अडीच वर्षांपासून मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाचे उरलेले तुकडेही मिळण्याची वाट पाहत होते. गेल्या अडीच वर्षांपासून विकास वालकर जेव्हा जेव्हा साकेत कोर्टात हजर राहायचे, तेव्हा त्यांना कोर्ट रुममध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवलेला बॉक्स दिसायचा. त्यांनी वारंवार हे उर्वरित तुकडे देण्याची मागणी केली, पण या प्रकरणातील महत्वाचा पुरावा असल्याने कोर्टाने शेवटपर्यंत मृतदेहाचे तुकडे दिले नाही.

श्रद्धाच्या हत्येने संपूर्ण देश हादरला...ही घटना 18 मे 2022 रोजी दिल्लीतील मेहरौली भागात घडली. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाटी शरीराचे 35 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर एक एक करत तो या तुकड्यांची विल्हेवाट लावायचा. सहा महिने आपल्या मुलीचा संपर्क न झाल्याने वडील विकास वालकर यांनी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. 12 नोव्हेंबर 2022 रोजी आफताबला मेहरौली येथे शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावताना पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई