'माझं पोट थोडंसं लहान दाखवा', मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 16:57 IST2017-12-07T16:48:34+5:302017-12-07T16:57:11+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

'Show my stomach a little', Raj Thackeray's request to the barely | 'माझं पोट थोडंसं लहान दाखवा', मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती

'माझं पोट थोडंसं लहान दाखवा', मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती

मुंबई:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंगळवारी झी समुहाच्या 'झी मराठी दिशा' या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या कार्यक्रमातला हा प्रसंग आहे.   

मी सध्या फेसबुकवर व्यंगचित्र प्रकाशित करतो , आता 'झी मराठी दिशा' या साप्ताहिकासाठी आपण व्यंगचित्र काढू अशी माहिती राज ठाकरेंनी यावेळी आपल्या भाषणात दिली. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. भाषणाच्या अखेरीस फडणवीसांनी राज ठाकरे यांना एक विनंती केली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

राज ठाकरे माझे मित्र आहेत त्यामुळे तुमच्याकडे माझी एक विनंती आहे... मी लठ्ठ आहे हे मला माहीत आहे पण माझं व्यंगचित्र काढताना माझं पोट इतकं तिप्पट मोठं दाखवतात... माझी विनंती आहे नाक मोठं दाखवा, कान लांब दाखवा, टक्कल दाखवा पण पोट थोडंसं लहान दाखवा...' अशी मिश्किल विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली... आणि उपस्थितांत एकच हशा पिकला. 

पाहा व्हिडीओ -



 

 

Web Title: 'Show my stomach a little', Raj Thackeray's request to the barely