महिला प्रसाधनगृहात केले चित्रीकरण

By Admin | Updated: June 13, 2015 02:26 IST2015-06-13T02:26:17+5:302015-06-13T02:26:17+5:30

माजीवडा येथील विवियाना मॉलमध्ये पतीसह आलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचे मॉलमधील लेडिज बाथरूममध्येच अनोळखी इसमाने मोबाइलद्वारे

Shooting in the women's toilet room | महिला प्रसाधनगृहात केले चित्रीकरण

महिला प्रसाधनगृहात केले चित्रीकरण

ठाणे : माजीवडा येथील विवियाना मॉलमध्ये पतीसह आलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचे मॉलमधील लेडिज बाथरूममध्येच अनोळखी इसमाने मोबाइलद्वारे चित्रीकरण करून विनयभंगाचा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना रविवारी रात्री १२.१५ च्या सुमारास घडली.
बाथरूमध्ये आपले कोणीतरी चित्रीकरण करीत असल्याचे लक्षात येताच, तिने ही बाब पतीला सांगितले. याच दरम्यान, त्या अनोळखी इसमाने बाथरूममधून धावत येत येऊन तिच्या पतीला धक्का मारून तेथून पळ काढला. या प्रकरणी तिने गुरुवारी सायंकाळी तक्रार दाखल केली असून अद्यापही कोणालाही अटक केली नसल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
मॉलमधील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात चित्रिकरण करणारा तो व्यक्ती कैद झाला आहे. मात्र, ते चित्र स्पष्ट दिसत नाही. फुटेजद्वारे त्याचा शोध सुरु आहे, असे वर्तक नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.जी.गावीत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Shooting in the women's toilet room