धक्कादायक! AI च्या मदतीने बनवला तरुणींचा अश्लील व्हिडीओ, पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 12:40 IST2023-08-24T12:39:33+5:302023-08-24T12:40:10+5:30

Crime: गेल्या काही काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. मात्र या एआयचा गैरवापर होत असल्याच्याही काही घटना समोर येत आहेत. दरम्यान, पालघर येथून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गैरवापराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Shocking! Indecent video of young women made with the help of AI, two children of a police officer arrested | धक्कादायक! AI च्या मदतीने बनवला तरुणींचा अश्लील व्हिडीओ, पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले अटकेत 

धक्कादायक! AI च्या मदतीने बनवला तरुणींचा अश्लील व्हिडीओ, पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले अटकेत 

गेल्या काही काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. मात्र या एआयचा गैरवापर होत असल्याच्याही काही घटना समोर येत आहेत. दरम्यान, पालघर येथून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गैरवापराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या दोन मुलांनी एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन तरुणी आणि महिलांचे अश्लील व्हिडीओ तयार केले. तसेच ते सोशल मीडियावर शेअर केले. एवढंच नाही तर हा प्रकार जेव्हा त्या तरुणींना समजला तेव्हा त्यांनी आरोपींना विरोध केला. मात्र आरोपींनी या तरुणींना मारहाण केली.

या घटनेनंतर दोन्ही तरुणींनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले. अखेरीस या तरुणांना अटक करण्यात आली आहे. पालघरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याण करपे यांनी सांगितले की, आरोपींचं वय हे १९ आणि २१ वर्षे असून, त्यांचे वडील मुंबई पोलिसांमध्ये सेवेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींनी महिला आणि तरुणींच्या फोटोंमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा वापर करून अश्लील व्हिडीओ तयार केले. त्यांची शिकार बनलेल्या दोन तरुणींनी व्हिडीओवरून आरोपींना विचारणा केली. तेव्हा या दोन्ही आरोपींनी त्या तरुणींना मारहाण केली. शेवटी वैतागून या तरुणींनी पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी या प्रकरणी पॉस्को अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Shocking! Indecent video of young women made with the help of AI, two children of a police officer arrested