धक्कादायक - आजीचा खून करुन शवाची केली शेकोटी

By Admin | Updated: September 13, 2016 17:08 IST2016-09-13T17:02:59+5:302016-09-13T17:08:58+5:30

एका मनोरूग्णाने आजीला ठार मारून तिचे शव पेटवण्याचा आणि तिथंच रात्रभऱ शेकत बसण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Shocking - the burning fire of the grandmother and the dead body | धक्कादायक - आजीचा खून करुन शवाची केली शेकोटी

धक्कादायक - आजीचा खून करुन शवाची केली शेकोटी

>
मनोरुग्ण नातवाचे कृत्य : त्र्यंबक तालुक्यातील धक्कादायक घटना
अझहर शेख, ऑनलाइन लोकमत
नाशिक : आई-वडीलानंतर मुलांना सर्वाधिक जे प्रिय आणि जवळचे वाटतात ते आजी-आजोबा. अशाच एका आदिवासी भागातील आजीने हलाखीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करून नातवाला पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळून मोठे केले. त्याच नातवाने अचानकपणे एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे वर्तन करुन आजीची क्रूरपणे हत्या केली. मनोरुग्ण नातू एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मध्यरात्रीच आजीच्या शवाची शेकोटी केल्याची ह्रदय हेलावणारी घटना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसुल गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर कोटम्बी हे लहान आदिवासी दुर्गम गाव आहे. कोटम्बी शिवारातच माळरानात एका झोपडीमध्ये भगवान भोये हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या कुटुंबात त्यांची आई रखमीबाई राजाराम भोये (८५), पत्नी चिमीबाई भगवान भोये, मुलगा कैलास भगवान भोये (१९) यांचा समावेश आहे. कैलास हा शेतीकाम मोलमजूरी करतो आणि तो निर्व्यसनी असल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात; मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून त्याचे वर्तन अचनाकपणे बदलल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. तो एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे वागू लागल्याचे त्याच्या काही नातेवाईकांनी सांगितले. सोमवारी (दि.१२) कैलासने रात्रीच्या सुमारास झोपडीमध्ये गोंधळ घालत आजी व आईला मारहाण करण्यास सुरूवात केली. गावामध्ये भागवत कथेचे पारायण सरु  असल्याने त्याचे वडील भगवान हे कार्यक्रमात बसलेले होते. कैलासने आजीची क्रूरपणे हत्त्या केली यावेळी मध्यस्थी करणाऱ्या आईलाही त्याने गंभीर जखमी केले आहे. 
रुग्णवाहिकेची तोडफोड
नाशिक जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेल्या या मनोरुग्णाने तिथेही धुमाकूळ घातला असून रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या आहेत. त्याने आईवरही हल्ला केला आणि तिला जखमी केले, परिणामी आईला खाली अर्ध्या वाटेत उतरवून द्यावे लागले. आईवर उपचार करण्यासाठी वेगळी रुग्णवाहिका रवाना झाली

Web Title: Shocking - the burning fire of the grandmother and the dead body