शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

धक्कादायक! आदिवासी मुलींना बाथरूममध्ये नेऊन शाळेचा संचालकच करत होता अश्लील चाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 6:34 PM

जुन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्नरमधल्या येनेरे तालुक्यातील इंडियन इंग्लिश मीडियम शाळेच्या संचालकानं आदिवासी विद्यार्थिनींशीच अश्लील कृत्य केलं आहे.

जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून शिक्षकांनी विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संपातजनक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेचा संस्थापक सचिन घोगरेसह दोन शिक्षकांवर पालकांच्या फिर्यादीवरून जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत जव्हार प्रकल्पातील २५० विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम शिकतात. स्कूलमधील आदिवासी विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून त्यांच्याबरोबर छेडछाड करून, विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करत शिक्षकांनी स्वतःच्या पेशाला काळिमा फासला आहे. त्यामुळे आदिवासी अस्मिता संघटना पालघर यांनी पुढाकार घेऊन आदिवासी विद्यार्थिनींना न्याय मिळण्यासाठी पालकांना हाताशी घेऊन त्या संचालकासह दोन शिक्षकांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी त्या आरोपींना अटकही केली आहे. त्यामुळे जव्हार प्रकल्पातील विद्यार्थी -पालकांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुलांसाठी मोफत खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची निवड करून आदिवासी विकास विभागाकडून निवड केलेल्या इंग्रजी नामांकित शाळांत ही मुले पाठवली जात आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण फी आदिवासी विकास प्रकल्पातून भरली जाते. मात्र जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींवर झालेला हा प्रकार घृणास्पद आहे. त्यामुळे जव्हार तालुक्यातील पालकांचीही काळजी वाढली आहे. ज्या पालकांची मुले येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आदिवासी विकास प्रकल्पातील महिनाभरापूर्वी पाचगणी येथिल इंग्लिश मीडियम शाळांत डहाणू प्रकल्पामधील एका विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. तसेच या पंचगणी शाळेत मागील काही वर्षांपासून वारंवार तक्रारी येत आहेत, तरी या शाळेत प्रकल्प कार्यालय विद्यार्थी का पाठवते ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच असे प्रकार आदिवासी विकास प्रकल्पाने निवडलेल्या इंग्लिश आश्रमशाळांमध्ये घडत असल्यानं सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे आदिवासी विद्यार्थिनींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंग