शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे मंत्री अधिकारांवरून नाराज

By admin | Updated: December 17, 2014 02:54 IST

शिवसेनेला दिलेल्या पर्यावरण, राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या खात्यांकडे फारसे अधिकार नसल्याने रामदास कदम, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे समजते.

संदीप प्रधान, नागपूरशिवसेनेला दिलेल्या पर्यावरण, राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या खात्यांकडे फारसे अधिकार नसल्याने रामदास कदम, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे समजते. ऊर्जा, जलसंपदा यासारखी महत्वाची खाती शिवसेनेला मिळावीत याकरिता मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरण्याचा विचार शिवसेनेत सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही मंत्री झालेल्या सुभाष देसाई यांच्याबाबत शिवसेना आमदारांत तीव्र नाराजी असून शिवसेनेला मिळालेल्या उद्योग खात्यावर त्यांनी कब्जा केल्याबद्दल सहकारी मंत्रीही नापसंतीचा सूर काढत आहेत.रामदास कदम व एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला मिळालेल्या खात्यांबाबत नापसंती व्यक्त केल्याचे कळते. पर्यावरण खात्यामधील दोन-तीन प्रमुख समित्यांना निर्णयाचे अधिकार आहेत. त्यामुळे मंत्रीपद नाममात्र असल्याची तक्रार कदम यांनी केल्याचे समजते तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मंत्रीपदापेक्षा विरोधी पक्षनेतेपद अधिक महत्वाचे होते. या खात्यात राम नसल्याची भावना शिंदे यांनी ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवल्याचे समजते. शिवसेनेच्यावतीने भाजपासोबत वाटाघाटी करताना सुभाष देसाई यांनी उद्योग खाते मिळवले व ते स्वत:कडे राखले. वस्तुत: हे खाते शिंदे यांना देण्यात येणार होते. परंतु आपण ज्येष्ठ असल्याने हे खाते आपल्याला मिळायला हवे, असा आग्रह देसाई यांनी धरला. शिवसेनेतर्फे वाटाघाटी करणाऱ्या देसाई यांनी हेतूत: बोटचेपी भूमिका घेतल्याने ऊर्जा, जलसंपदा यासारखी खाती शिवसेनेला मिळू शकली नाही, अशी आमदार व मंत्र्यांचीही भावना आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुभाष देसाई यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्री केल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. तीन ते चार टर्म निवडून येऊनही जर पराभूतांना मंत्रीपदाची बक्षिसी मिळणार असेल तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल शिवसेनेचे आमदार करीत आहेत. मंत्रीपदे भरताना मराठवाड्याचाच विचार झाला पाहिजे, असा आग्रह होत आहे.